Join us

मी हॉटी, नॉटी आणि सिक्टी; रवी शास्त्रींनी पोस्ट केला 'तो' फोटो अन् चाहते सैराट

Ravi Shastri News: रवी शास्त्री सध्या समालोचनाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 14:12 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रवी शास्त्री सध्या समालोचनाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना त्यांच्या विनोदी शैलीसाठी ओळखले जाते. शास्त्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आता त्यांनी एक अनोखा फोटो पोस्ट केला असून चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते कमेंटच्या माध्यमातून टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकांचे कौतुक करत आहेत. 

रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत म्हटले की, मी आकर्षक, खोडकर आणि ६० वर्षांचा आहे. चाहते शास्त्रींच्या फोटोवर कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, तेव्हा देखील सुंदर, आताही आणि आणखी सुंदर रवी शास्त्री नेहमी असेच राहा. गणपती बाप्पा तुम्हाला नेहमी आशीर्वाद देत राहो. तर काही अतिउत्साही चाहत्यांनी शास्त्रींना आजच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खरं तर त्यांचा जन्म २७ मे १९६२ मध्ये झाला होता. 

रवी शास्त्री सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत. त्यांनी भारतासाठी १९८१ आणि १९९२ दरम्यान कसोटी आणि वन डे क्रिकेट खेळले आहे. एक गोलंदाज म्हणून त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. पण, कालांतराने भारतीय क्रिकेटला त्यांच्या रूपात एक प्रभावी फलंदाजही मिळाला. त्यांनी विराट कोहली कर्णधार असताना भारतीय संघाचे प्रशिक्षकपद देखील सांभाळले आहे. 

दरम्यान, सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. माजी खेळाडू विविध माध्यमातून या स्पर्धेशी जोडले आहेत. रवी शास्त्री, सुरेश रैना, पार्थिव पटेल, आकाश चोप्रा, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, केव्हिन पीटरसन, मायकेल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ यांसारखे खेळाडू आयपीएल २०२४ मध्ये समालोचन करत आहेत. 

टॅग्स :रवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ