न्यूयॉर्क : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू रस्टी थेरॉन येत्या काही दिवसांत अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये आता रस्टी थेरॉनचेही नाव आले आहे. अमेरिका प्रथमच अधिकृत वन डे क्रिकेट मालिकेचे यजमानपद भूषवित आहे. पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया या संघांचा या मालिकेत सहभाग असणार आहे. या मालिकेतून रस्टी हा अमेरिकेकडून पदार्पण करणार आहे. दोन देशांकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो दक्षिण आफ्रिकेचा तिसरा खेळाडू आहे.
भारतात होणाऱ्या 2023च्या वर्ल्ड कपची चुरस रंगतदार; आयसीसीनं सांगितला यशाचा मार्गइंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 2023च्या वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात केली आहे. 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारतानं स्थान पक्के केले आहे आणि आयसीसी क्रमवारीनुसार भारत सोडून सुपर लीगमधील अव्वल सात संघ थेट पात्र ठरणार आहेत. पण, उर्वरित दोन स्थानांसाठी जवळपास 17 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.