PICS : "आयुष्यात खूप कमी गोष्टी मला आनंद देतात...", एबी डिव्हिलियर्सची पत्नीसह मुंबईत 'भटकंती'

ab de villiers in mumbai : आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स सध्या मुंबईत कुटुंबीयांसह आनंद घेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:14 PM2023-03-30T18:14:43+5:302023-03-30T18:15:31+5:30

whatsapp join usJoin us
 Former South African and Royal Challengers Bangalore player AB de Villiers is in Mumbai enjoying the IPL with his family  | PICS : "आयुष्यात खूप कमी गोष्टी मला आनंद देतात...", एबी डिव्हिलियर्सची पत्नीसह मुंबईत 'भटकंती'

PICS : "आयुष्यात खूप कमी गोष्टी मला आनंद देतात...", एबी डिव्हिलियर्सची पत्नीसह मुंबईत 'भटकंती'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ab de villiers । मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स सध्या मुंबईत कुटुंबीयांसह आनंद घेत आहे. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) त्यांचे दोन खेळाडू ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना हॉल ऑफ फेमने सन्मानित केले. खरं तर एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये प्रथमच समालोचन करताना दिसणार आहे. 

दरम्यान, मिस्टर 360 म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या डिव्हिलियर्सने 2021 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. तेव्हापासून मिस्टर 360 क्रिकेटपासून दूर आहे. 2021 मध्ये तो शेवटच्या वेळी आरसीबीच्या संघातून खेळला होता. आयपीएलमधील अखेरच्या सामन्यात डिव्हिलियर्सने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध 11 धावा केल्या होत्या. पण क्रिकेटपासून दूर असलेला डिव्हिलियर्स त्याचे नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. नुकताच त्याने विराट कोहलीच्या मुंबईतील रेस्टॉरंटमधील फोटो पोस्ट केला होता. आता त्याने पत्नी आणि मुलांसह काही फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये पाहायला मिळत आहे की, मिस्टर 360 पत्नी आणि मुलांसह मुंबईतील 'द गेम पलासिओ'मध्ये आनंद घेत आहे. यावेळी डिव्हिलियर्सच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. "या आयुष्यात माझ्या मुलांना मस्ती करताना पाहण्याव्यतिरिक्त खूप कमी गोष्टी मला आनंद देतात", असे डिव्हिलियर्सने फोटो शेअर करताना लिहले आहे.


 
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची मैत्री जगजाहीर आहे. डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 157 सामन्यांमध्ये 4522 धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सने 2008 ते 2010 पर्यंत दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आणि मग तो आरसीबीच्या ताफ्यात सामील झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title:  Former South African and Royal Challengers Bangalore player AB de Villiers is in Mumbai enjoying the IPL with his family 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.