Join us  

भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा शिपाईच्या पोस्टसाठी अर्ज!

सामन्य कामगारालाच नव्हे तर खेळाडूंनाही कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:53 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अनेकांची नोकरी गेली, अनेकांनी कर्मभूमीतून जन्मभूमीकडे जाणे पसंत केले, पण त्यांची उपासमार काही थांबली नाही. भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंना कुठे रिक्षा चालवावी, भाजी विकावी, तर मनरेगात मजदूराचे काम करावे लागत आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय दिव्यांग संघाचा माजी कर्णधार दिनेश सैन यानं चक्क राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधन एजंसीत ( नाडा) शिपायाच्या पोस्टसाठी अर्ज केला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' पण नसता; बबिता फोगाट

लहानपणी पोलिओमुळे त्याला दिव्यांगपण आले. त्यानं 2015 ते 2019 या कालावधीत 9 सामन्यांत भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. 35 वर्षीय दिनेशला त्याच्या कुटुंबासाठी स्थिर उत्पन्न कमवायचे आहे. पत्नी आणि ए वर्षांची चिमुकली असा त्याचा परिवार आहे.''मी आता 35 वर्षांचा आहे आणि पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. 12वीनंतर मी फक्त क्रिकेट खेळलो आणि देशाचे प्रतिनिधित्व केलं, परंतु आता माझ्याकडे पैसा नाही. 'नाडा'त शिपायाची एक पोस्ट रिक्त आहे,''असे त्यानं सांगितले. 

आतापर्यंत मोठ्या भावानं दिनेशची आणि त्याच्या कुटुंबीयांची काळजी घेतली, परंतु आता त्यालाही ते जमणारं नाही आणि म्हणून मला ही नोकरी हवी आहे. तो म्हणाला,''सामान्य व्यक्तीसाठी या पदाकरिता वय मर्यादा ही 25 वर्ष आहे, परंतु मी दिव्यांग विभागात येतो आणि 35 वर्ष ही वयाची अट आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही माझी शेवटची संधी आहे.'' 

''जन्मापासून मी एका पायानं अपंग आहे, परंतु क्रिकेटवरील असलेल्या प्रेमानं मला ते कधी जाणवू दिले नाही. 2015च्या पाच देशांच्या क्रिकेट स्पर्धेत मी सर्वाधिक 8 विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध मी दोन विकेट्स घेतल्या होत्या,''असेही दिनेश म्हणाला. 2019मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतानं जेतेपद पटकावलं आणि त्यात दिनेशचाही समावेश होता. पण, त्याचा संघात समावेश नव्हता, परंतु नवीन मुलांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली होती.   

बोंबला! पाकिस्तान संघाची सर्व उपकरणे जप्त होणार; परवेझ मुशर्रफ यांचा करार महागात पडणार

Big News : ट्वेंटी-20 लीगचं वेळापत्रक जाहीर; शाहरूख खानचा संघ सलामीचा सामना खेळणार 

 

टॅग्स :नोकरीभारतीय क्रिकेट संघ