Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या मदतीला धावला पाकिस्तानी खेळाडू; तिच्यावर टीकेचे 'तीर' सोडणाऱ्यांना सुनावलं

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:06 IST

Open in App

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहमी वादग्रस्ट टिप्पणी करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधणाऱ्या कंगना आणि आणि ट्रोलर्सचं जुन नातं आहे. मंगळवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात दसरा साजरा झाला. अशातच सोशल मीडियावर कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल होत असणाऱ्या कंगनाला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी लक्ष्य केलं. खरं तर कंगनाने दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केलं. या कार्यक्रमामधील कंगनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका चुकीमुळे तिने ट्रोलर्सला आमंत्रण दिले. एकिकडे नेटकरी कंगनावर टीका करत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू तिच्या मदतीला धावल्याचे दिसते.

नामांकित वकील प्रशांत भूषण यांनी कंगनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दिसते की, रावणाचं दहन करण्यासाठी कंगनानं धनुष्यबाणातून बाण सोडला पण तिचा नेम चुकला. असे दोनदा घडले. प्रशांत भूषण यांनी या घटनेचा दाखला देत अभिनेत्रीवर टीका केली. याला पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियानं प्रत्युत्तर दिलं आहे. 

दिल्लीच्या रामलीला मैदानावरील रावण दहनाचा कार्यक्रम कंगना रणौतच्या हस्ते पार पडला. यावेळी कंगनानं केशरी रंगाची ब्रोकेड बनारसी साडी परिधान करुन केसात लाल रंगाचा गजराही लावला होता. ५० वर्षांच्या इतिहासात एका महिलेकडून बाण मारून रावणाचा पुतळा जाळण्याची ही पहिलीच वेळ होती. लवकुश रामलीलामध्ये रावणाचं दहन करण्यासाठी कंगनानं धनुष्यबाणातून बाण सोडला पण तिचा नेम चुकला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कनेरियाने कंगणावर टीकेचे 'तीर' सोडणाऱ्यांना सुनावलंप्रशांत भूषण यांच्यासह कंगनाच्या टीकाकारांना सुनावताना दानिश कनेरियानं म्हटले, "एखाद्याची खिल्ली उडवणं ही खूप गोष्ट आहे. कमीत कमी कंगणानं तिच्या देशासाठी रील लाइफमध्ये काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि तुम्ही जीवनात काहीच चांगलं करू शकत नाही. मणिकर्णिका हा पाहिलाच पाहिजे असा चित्रपट आहे, ज्याने आपल्या सर्वांच्या जीवनात देशभक्ती आणि स्वाभिमानाची भावना पुन्हा जिवंत केली आहे." 

टॅग्स :कंगना राणौतपाकिस्तानट्रोल