टीम इंडियाचा (Team India) माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि हेजल यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. युवराज सिंगच्या घरी छोट्या 'युवराजा'चं आगमन झालं असून त्यानं सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
युवराज सिंगनं आपल्या सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी आपल्या फॅन्ससोबत शेअर केली. तसंच त्यानं देवाचेही आभार मानले. ही बातमी शेअर करतच आपल्या प्रायव्हसीचाही आदर करण्याचं आवाहन त्यानं आपल्या चाहत्यांकडे केलं आहे.
३० डिसेंबर २०१६ रोजी युवराज सिंग आणि हेजल यांचा विवाह झाला होता. हेजलनं यापूर्वी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. तसंच तिनं बिल्ला आणि बॉडिगार्डसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. परंतु लग्नानंतर हेजर चित्रपटसृष्टीत जास्त अॅक्टिव्ह दिसली नाही.