सचिन तेंडुलकरनं T-20 WC मधून निवडला अंतिम एकादश संघ; 5 ऑस्ट्रेलियन खेळाढूंना दिलं स्थान

सचिन तेंदुलकरच्या संघात ओपनर म्हणून डेव्हिड वॉर्नरचा समावेश आहे. तर जोस बटलर त्याच्यासोबत ओपनिंग करताना दिसत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 16:07 IST2021-11-17T16:07:28+5:302021-11-17T16:07:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Former indian cricketer sachin tendulkar best xi from semi finalists | सचिन तेंडुलकरनं T-20 WC मधून निवडला अंतिम एकादश संघ; 5 ऑस्ट्रेलियन खेळाढूंना दिलं स्थान

सचिन तेंडुलकरनं T-20 WC मधून निवडला अंतिम एकादश संघ; 5 ऑस्ट्रेलियन खेळाढूंना दिलं स्थान

ICC T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे चार संघ 2021 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले होते. टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंदुलकरने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील या चार संघांना एकत्र करून बेस्ट 11 तयार केले आहेत.

सचिन तेंदुलकरने ऑस्ट्रलियन संघाच्या खेळाडूंवर अधिक विश्वास दर्शवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंना आपल्या संघात जगा दिली आहे. सचिन तेंदुलकरच्या संघात ओपनर म्हणून डेव्हिड वॉर्नरचा समावेश आहे. तर जोस बटलर त्याच्यासोबत ओपनिंग करताना दिसत आहे. जोस बटलर त्याच्या संघाचा विकेट किपरही आहे.

सचिनने मधल्या फळीत बाबर आझम, केन विल्यमसन आणि अष्टपैलू मोईन अली यांना स्थान दिले आहे. सचिन तेंडुलकरने केन विल्यमसनच्या कर्णधारपदावर विश्वास व्यक्त केला असून त्याला आपल्या संघाचा कर्णधारही बनवले आहे. त्याने मिचेल मार्श आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोन अष्टपैलू खेळाडूंना फिनिशरच्या भूमिकेत ठेवले आहे. तर पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झम्पा यांच्यावर त्याने गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे.

असा आहे सचिन तेंडुलकारचा संघ - 
डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर (WK), बाबर आझम, केन विल्यमसन (C), मोईन अली, मिचेल मार्श, लियाम लिव्हिंगस्टोन, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, ट्रेंट बोल्ट

Web Title: Former indian cricketer sachin tendulkar best xi from semi finalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.