Join us  

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणे भारतीय क्रिकेटपटूला पडले महागात; पोलिसांनी केली कारवाई

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 4 लाख 74,272 इतका झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 4:14 PM

Open in App
ठळक मुद्देघरापासून दोन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करण्यास आहे बंदीई पास नसताना केला लांबचा प्रवास

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात अजूनही लॉकडाऊन आहे. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी आहे, त्या भागात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. पण, काही ठिकाणी अजूनही नियमांचं काटेकोर पालन होत आहे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईही केली जात आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉबीन सिंग याला लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणे महागात पडले आहे. रॉबीन सिंगनं नियम मोडला आणि त्याला चेन्नई पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

लॉकडाऊनमध्ये रॉबीन सिंग अद्यार ते उथंडी येथे भाज्या घेण्यासाठी गेला होता. पण, लॉकडाऊनमध्ये लोकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ 2 किलोमीटर प्रवास करण्याची परवानगी आहे. रॉबीननं या नियमाचे उल्लंघन केलं आणि पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली. 

IANSकडे पोलीस अधिकार्यानं सांगितले की,''शनिवारी सकाळी रॉबीन सिंग इस्ट कोस्ट रोडवरून येत होता आमि तेथे तपास करताना त्याच्याकड ई पास नसल्याचे आढळले. शिवाय कारने लांबचा प्रवास का केला, याचं पटेल असं कारणही देता आलं नाही. नियमांच उल्लंघन केल्यामुळे आम्ही त्याची गाडी जप्त केली. त्यानेही कोणताही वाद न घालता, चूक मान्य केली.'' 19 जूनपासून चेन्नई 12 दिवस संपूर्णपणे लॉकडाऊन आहे आणि रॉबीन सिंगनं दोन किमीपेक्षा अधिक अंतरचा प्रवास केला.   

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 95 लाख 52, 096 इतकी झाली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 4 लाख 74,272 इतका झाला असून 14914 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 लाख 71934 रुग्ण बरे झाले आहेत. रॉबीन सिंगनं भारतासाठी 136 वन डे व 1 कसोटी सामना खेळला आहे. त्यानं वन डेत 2336 धावा केल्या आणि 69 विकेट्स घेतल्या. निवृत्तीनंतर तो इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.  

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटतेय भीती; BCCI कडून मागितली लेखी हमी

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा

IPL 2020 साठी BCCIने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली विनंती!

Photo : या सुंदरीनं जिंकलाय जगातील 'सेक्सी' रेफरीचा किताब; फुटबॉलपटूही पडलेत प्रेमात!

पाच महिन्यांनंतर रोहित शर्मा मैदानावर सरावासाठी उतरला; म्हणाला...

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याचेन्नई