Photo : या सुंदरीनं जिंकलाय जगातील 'सेक्सी' रेफरीचा किताब; फुटबॉलपटूही पडलेत प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:18 PM2020-06-25T13:18:23+5:302020-06-25T13:21:29+5:30

जगात सर्वाधिक चाहते असलेल्या खेळांमध्ये फुटबॉल अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे फुटबॉलपटूंचा चाहतावर्गही तेवढाच मोठ्या संख्येत आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेयमार हे दिग्गज फुटबॉलपटू सोशल मीडियावर पोस्ट करून इतके पैसे कमावतात की त्यांच्या क्लब कराराची रक्कमही तोकडी वाटते.

फुटबॉलपटूंच्या लाईफस्टाईलबद्दल, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर चाहत्यांची बारीक नजर असले. फुटबॉलपटूंप्रमाणे त्यांची गर्लफ्रेंड्स आणि पत्नी यांचीही सोशल मीडियावर हवा असते.

आज आपण जगातल्या सर्वात सेक्सी रेफरीचा किताब मिळवणाऱ्या महिला अंपायरची भेट घेणार आहोत.

कॅरोलिना बोजार असे या युवतीचं नाव आहे. पोलंडच्या 21 वर्षीय कॅरोलिनाला दी सन मॅग्झीननं जगातील सर्वात सेक्सी रेफरी म्हणून गौरविले होते.

कॅरोलिनानं जॅगेलियोनियन युनिव्हर्सिटीतून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. पण, तिचं खरं प्रेम हे फुटबॉल होतं.

तिचे आजोबा फुटबॉल रेफरी होते आणि त्यामुळे तिनं शिक्षणासोबत फुटबॉलची आवडही जपली.

17 वर्षी पहिल्यांदा ती फुटबॉल मैदानावर रेफरीच्या भूमिकेत दिसली होती.

त्या सामन्यात एक पेनल्टी कॉर्नरचा निर्णय दिल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रशिक्षकानं मैदानावर धाव घेतली आणि तिला खूप बडबड केली होती.

पण, ती खचली नाही. आतापर्यंत तिनं अनेक सामन्यांत रेफरीची भूमिका पार पाडली आहे. तिच्या सुंदरतेचे फुटबॉलपटूही दिवाने आहेत.

सोशल मीडियावरही तिच्या फॅन्स फॉलोअर्सची संख्या अधिक आहे.

तिनं युरोपातील दोन मोठे क्लब हॅजडूक स्पलिट आणि गोर्निक जबरजे यांच्या सामन्यात रेफरीची भूमिका पार पाडली होती.

ला लिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग आदी मोठ्या लीगमध्ये तिला रेफरीचे काम करण्याचे तिचं स्वप्न आहे.