Join us  

Breaking : भारताचे दिग्गज फलंदाज चेतन चौहान यांचे निधन 

चेतन चौहान यांना शुक्रवारी व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 5:43 PM

Open in App

भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. चेतन चौहान  यांना मागील महिन्यात कोरोना झाला होता. पण, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांचे  निधन झाल्याची माहिती त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहाऩ यांनी दिली. किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.  मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरूग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ( Former India cricketer Chetan Chauhan has died)

जुलै महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. ( Former India cricketer Chetan Chauhan has died)

चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांची भागीदारी केली असून त्यांच्या नावावर 10 शतकी भागीदारी आहेत. 1979 साली कसोटीत त्यांनी ओव्हलवर 213 धावांची भागीदारी करून विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांचा 203 धावांचा विक्रम मोडला होता. कसोटीत 2000 हून अधिक धावा करूनही एकही शतक नावावर नसलेले ते एकमेव खेळाडू आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यांत 40.22 च्या सरासरीनं 21 शतकं आणि 59 अर्धशतकांसह 11 हजार धावा केल्या.  ( Former India cricketer Chetan Chauhan has died)

1981मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला आणि त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले. 1981मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले.  

2001 मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. जून 2016 ते जून 2017 या कालावधीत ते National Institute of Fashion Technologyच्या चेअरमनपदावर होते. त्यांनी उत्तर प्रदेश येथील अमरोह येथून 1991 व 1998 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. ऑगस्ट 2018मध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये त्यांना युवा व क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीचा पहिला पगार किती होता माहित्येय; आज 760 कोटींचा धनी 

निवृत्तीच्या घोषणेनंतर मेहंद्रसिंग धोनी अन् सुरेश रैनानं मारली मिठी; पाहा इमोशनल Video

सुरेश रैनाचे 'हे' विक्रम तुम्हाला करतील चकीत! 

... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला

भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी तू एक आहेस - रोहित शर्मा 

मला माहित्येय तुला रडावासं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघउत्तर प्रदेशकोरोना वायरस बातम्या