"मी लवकरच...", अंबाती रायुडूकडून नव्या 'इनिंग'ची घोषणा; आता राजकारणात आजमावणार नशीब

Ambati Rayudu Enters Into Politics : अंबाती रायुडूने आपल्या जीवनातील नव्या इनिंगची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 02:12 PM2023-06-30T14:12:20+5:302023-06-30T14:12:53+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian cricketer Ambati Rayudu will soon enter politics in Andhra Pradesh  | "मी लवकरच...", अंबाती रायुडूकडून नव्या 'इनिंग'ची घोषणा; आता राजकारणात आजमावणार नशीब

"मी लवकरच...", अंबाती रायुडूकडून नव्या 'इनिंग'ची घोषणा; आता राजकारणात आजमावणार नशीब

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ambati Rayudu's New Innings : भारतीय संघाचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने जीवनातील आपल्या नव्या इनिंगची घोषणा केली आहे. क्रिकेटनंतर रायुडू आता राजकारणात नशीब आजमावणार आहे. तो लवकरच आंध्र प्रदेशच्याराजकारणात पाऊल ठेवणार असल्याचे समजते. क्रिकेटपटू अंबाती रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएल २०२३ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा होता. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला रायुडूने आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. 

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रायुडूने त्याच्या मूळ जिल्ह्यातील गुंटूर शहरातील कानाकोपऱ्याला भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "मी लवकरच आंध्र प्रदेशातील लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन लोकांची संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे ठरवले आहे", असे रायुडूने सांगितले. 

रायुडूकडून नव्या 'इनिंग'ची घोषणा
तसेच लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी तो ग्रामीण भागाचा दौरा करत असल्याचे रायडूने नमूद केले. लोकांशी संवाद साधत असताना रायुडूने म्हटले, "राजकारणात प्रवेश कधी करायचा आणि पुढची रूपरेषा कशी असेल यावर अद्याप ठोस निर्णय झाला नाही. योग्य वेळी मी ते जाहीर करेन." लक्षणीय बाब म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुंटूर किंवा मछलीपट्टणममधून निवडणूक लढवणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. 

रायुडू कोणत्या पक्षाचा होणार शिलेदार? 
भारताचा माजी खेळाडू कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतो दे अद्याप अस्पष्ट आहे. पण तो वायएसआर कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेत त्याने एक ट्विट करत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. "मस्तच भाषण... आपले मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी... राज्यातील प्रत्येकाला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे", अशा शब्दांत रायुडूने मुख्यमंत्री रेड्डी यांचे कौतुक केले होते. 

Web Title: Former Indian cricketer Ambati Rayudu will soon enter politics in Andhra Pradesh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.