Join us

Virender Sehwag: "मी शोएब अख्तरला अनेकवेळा बिझनेस दिलाय...", वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

virender sehwag on shoaib akhtar: भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शोएब अख्तरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:57 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शोएब अख्तरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू अख्तर आणि सेहवाग यांच्यात अनेकवेळा शाब्दिक चकमक झाली आहे. मात्र, वीरू आणि अख्तर यांची मैत्री किती घट्ट आहे याचा खुलासा सेहवागने केला आहे. मी टीव्ही कार्यक्रमांमध्ये अख्तरला बिझनेस मिळवून देण्याचे काम करतो, असा खुलासा करून वीरूने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

दरम्यान, रणवीर इलाहाबादीच्या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्ट दरम्यान, सेहवाग म्हणाला, "मी पाकिस्तानधील बरेच मित्र बनवले आहेत पण शोएब अख्तर हा माझा सर्वात चांगला मित्र आहे. मी त्याच्यावर टीका करतो, त्याची खिल्ली उडवतो पण मी अख्तरला अनेकवेळा बिझनेस देखील दिला आहे." 

सेहवागचा मोठा खुलासा अख्तर आणि त्याच्या मैत्रीबद्दल बोलताना वीरूने म्हटले, "मी टीव्ही प्रोग्राममध्ये असल्यास संबंधितांना सांगतो की, अख्तरला बोलावले पाहिजे कारण आमचे ट्यूनिंग खूप चांगले आहे. भारत-पाकिस्तानवर एक माहितीपट तयार केले जात आहे आणि मी असे म्हटले आहे की त्यात अख्तरचा समावेश करावा. मला खात्री आहे की चाहत्यांना आमच्या दोघांची भूमिका चांगली आवडेल."

तसेच शोएब अख्तर हा वास्तविक जीवनात एक चांगला व्यक्ती आहे, परंतु कॅमेर्‍यासमोर येताच त्याला काय होते हे माहित नाही. अख्तर कॅमेर्‍यासमोर अगदी वेगळा आहे. त्याने मला कॅमेर्‍यासमोर माझी चेष्टा करू नकोस असे सांगितले आहे. मला त्याच्याशी संवाद साधण्याचा आनंद आहे. मी त्याचा एक मित्र आहे, म्हणून मी त्याची खिल्ली देखील उडवतो, असेही सेहवागने सांगितले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :विरेंद्र सेहवागशोएब अख्तरपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघव्यवसाय
Open in App