Join us

भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक यांचे निधन; जहीर खान अन् जाफर यांचे गुरू

मुंबई : भारताचे माजी सलामीवीर आणि तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये क्युरेटरचे काम पाहणारे  सुधीर नाईक यांचे आज निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 20:03 IST

Open in App

मुंबई : भारताचे माजी सलामीवीर आणि तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये क्युरेटरचे काम पाहणारे  सुधीर नाईक यांचे आज निधन झाले. ७ दिवसांपूर्वी आजारी पडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. त्यांनी १९७४ साली भारताकडून ३ कसोटी व दोन वन डे सामने खेळले होते. स्फोटक सलामीवीर अशी त्यांची ख्याती होती आणि १९७४च्या इंग्लंड दौऱ्यावर ते टीम इंडियाच्या सलामीच्या जागेसाठी दावेदार होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४०.५५ च्या सरासरीने ७३० धावा केल्या होत्या. 

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कामगिरीमुळे त्यांना एडबस्टन कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले होते. त्या कसोटी त्यांच्या अखेरच्या ठरल्या. मुंबई संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी ४०.१०च्या सरासरीने २६८७ धावा केल्या होत्या आणि १९७३-७४ मध्ये बरोडाविरुद्ध नाबाद २०० धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने १९७०-७१ मध्ये रणजी करंडक जिंकला.  

मुंबई युनिव्हर्सिटी आणि टाटा ऑईल मिल्स या संघांकडूनही ते खेळले. नॅशनल क्रिकेट क्बलमध्ये प्रशिक्षक असताना त्यांच्या हाताखाली झहीर खान, वासिम जाफर, राजेश पवार, राजू सुतार, पारस म्हाम्ब्रे आदी खेळाडू घडले. २००५मध्ये त्यांच्या खांद्यावर वानखेडे स्टेडियमच्या क्युरेटरची जबाबदारी सोपवली गेली. २०११ च्या वर्ल्ड कप फायनलची खेळपट्टी नाईक यांच्या देखरेखीखाली तयार केली गेली होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमुंबई
Open in App