Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रशेखर यांचे निधन

न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे त्यांनी भारताकडून पदार्पण केले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 22:14 IST

Open in App

चेन्नई : भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचे निधन झाले, ते 57 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, असे म्हटले जात आहे.

क्रिकेट वर्तुळात चंद्रशेखर हे व्ही.बी. या नावाने ओळखले जायचे. तामिळनाडूचे फलंदाज असलेले चंद्रशेखर यांनी भारताकडून सात एकदिवसीय सामने खेळले होते. न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे त्यांनी भारताकडून पदार्पण केले होते. 

चंद्रशेखर तामिळनाडूच्या रणजी संघातील जनदार व्यक्तीमत्व होते. चंद्रशेखर यांनी माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांच्याबरोबर बऱ्याच भागीदाऱ्या रचल्या होत्या. चंद्रशेखर हे भारताच्या निवड समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी तामिळनाडूच्या संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते. चेन्नईमध्ये त्यांची एक क्रिकेट अकादमीही सुरु आहे.

टॅग्स :भारतरणजी करंडकतामिळनाडू