भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी शनिवारी खेळाडूंचे कान टोचले. एका कार्यक्रमात त्यांना सध्या खेळाडूंना प्रचंड तणावाचा ( Pressure) सामना करावा लागतोय, असा सवाल केला गेला. त्यावर कपिल देव यांनी स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, एवढाच तणाव वाटत असेल, तर खेळाडूंनी आयपीएल खेळू नये.
कपिल देव यांच्या या विधानावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ''मी अनेकदा टीव्हीवर एकतो की खेळाडूंवर आयपीएल खेळण्यासाठी प्रचंड तणाव आहे. तेव्हा मी त्यांना एकच सांगेन की आयपीएल नका खेळू. खेळाडूंमध्ये पॅशन असेल तर त्यांनी प्रेशर चा विचार करायचा नाही. या अमेरिकन शब्दांचं मला एक कळत नाही, उदा. द्यायचा झाल्यास डिप्रेशन... आम्ही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटायचो, म्हणून आम्ही खेळलो आणि जेव्हा तुम्ही खेळाचा आनंद लुटता तेव्हा तणावाला जागा असायलाच नको.
भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार आहेत. १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली १७५ धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी १३१ कसोटीत ४३४ विकेट्स अन् ५२४८ धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर २२५ सामन्यांत ३७८३ धावा आणि २५३ विकेट्स आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"