Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात

गांगुली बुधवारी रात्रीही रुग्णालयात राहतील आणि त्यांच्यावर गुरुवारी अँजियोप्लास्टी होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 06:35 IST

Open in App

कोलकाता : छातीत दुखू लागल्याने पुन्हा एकदा भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर नुकताच अँजियोप्लास्टी करण्यात आली होती आणि यास एक महिनाही उलटलेला नाही. एका खासगी रुग्णालयात गांगुली यांच्या अनेक चाचण्या झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गांगुली बुधवारी रात्रीही रुग्णालयात राहतील आणि त्यांच्यावर गुरुवारी अँजियोप्लास्टी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सौरभ गांगुलीहॉस्पिटल