Join us  

विनोद राय यांचा खुलासा; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड होता पहिली पसंती, पण...

अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशासकिय समितीनं सर्वप्रथम या पदासाठी द्रविडला विचारणा केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:38 PM

Open in App

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी महान खेळाडू राहुल द्रविड याच्या नावाला पहिली पसंती असल्याचा दावा प्रशासकिय समितीचे माजी प्रमुख विनोद राय यांनी केला. त्यासाठी त्यांनी राहुल द्रविडकडे विचारणा केली होती. पण, द्रविडनं ही ऑफर स्वीकारली नाही आणि रवी शास्त्री यांची निवड झाली. त्यानंतर द्रविडनं भारत A आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. 

अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशासकिय समितीनं सर्वप्रथम या पदासाठी द्रविडला विचारणा केली होती. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी जुळत नसल्यामुळे कुंबळे यांनी 2017मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. राय यांनी SportsKeeda शी बोलताना सांगितले की,''मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड पहिली पसंत होता. पण, त्यानं नकार दिला. तो म्हणाला, माझ्या घरात दोन वाढती मुलं आहेत आणि मला टीम इंडियासोबत जगभर फिरावं लागले. त्यामुळे मुलांना वेळ देता येणार नाही. मला त्यांना वेळ देणं महत्त्वाचं आहे आणि हा वेळ कुटुंबीयांचा आहे.''

त्याची विनंती योग्यच होती आणि त्याचा निर्णय आम्ही मान्य केला, असे राय यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''द्रविडनं युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणे, कायम राखण्याचे ठरवले. त्यामुळेच रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. प्रशिक्षक म्हणून द्रविड, शास्त्री आणि कुंबळे यांच्याकडे कौशल्य होते. आम्ही राहुलशी बोललो. तेव्हा तो 19 वर्षांखालील संघाला मार्गदर्शन करत होता आणि तो त्यांच्यात गुंतला होता. त्यांच्यासाठी त्यानं रोडमॅप तयार केला होता. त्यानं रिझल्टही दिले होते आणि त्यामुळे त्याला त्यांच्यासोब काम करणे कायम राखायचे होते.''

मागील वर्षी द्रविडकडे बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मुख्य पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी

बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'

सचिन तेंडुलकर ओपनिंगला नॉन स्ट्राइकवर का रहायचा? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण

टॅग्स :राहूल द्रविडरवी शास्त्रीबीसीसीआय