Join us

गरजूंच्या मदतीसाठी निम्मं वेतन दान करणाऱ्या क्रिकेटपटूला झाला कोरोना!

दोन दिवसांपूर्वी सासू अन् भाची हेही आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 16:29 IST

Open in App
ठळक मुद्देबांगलादेशातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं निम्म वेतन केलं दान दोन दिवसांपासून होता ताप

बांगलादेश क्रिकेटला शनिवारी दोन धक्के बसले. त्यांचा माजी क्रिकेटपटू नफीस इक्बाल याच्यानंतर त्यांचा माजी कर्णधार मश्रफे मोर्ताझा यालाही कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बांगलादेशमधील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेटपटूंनी निम्मं वेतन दान केलं होतं, त्यात मोर्ताझाचाही समावेश होता. शिवाय तो येथील लोकांसाठी कामही करत होता. दोन दिवसांपूर्वी मोर्ताझाची सासू आणि भाची यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले होते. 

पाच महिन्यानंतर शोएब - सानियाची भेट होणार; पाकिस्तान क्रिकेट मंडळानं दिली परवानगी

बांगलादेशच्या माजी कर्णधाराला मागील दोन दिवसांपासून ताप येत होता आणि त्यानं त्यानं वैद्यकिय चाचणी केली. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्याचा भाऊ मोर्सालीन मोर्ताझा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानं सांगितलं की,''माझा भाऊ होम आयसोलेट झाला आहे आणि तेथेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, अशी मी विनंती करतो.''  मोर्ताझानं 36 कसोटी, 220 वन डे आणि 54 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 797, 1787 आणि 377 धावांसह 78, 270 व 42 विकेट्स घेतल्या आहेत. 

जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरात 87 लाख 66,035 कोरोना रुग्ण आढळले असून 46 लाख 27,883 रुग्ण बरे झाले आहेत. पण, दुर्दैवानं 4 लाख 62,691 रुग्णांना जीव गमवावा लागला. बांगलादेशमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 05,535 इतकी झाली आहे. त्यापैकी 42945 रुग्ण बरे झाले असून 1388 रुग्णांना प्राण गमवावे लागले.

 

दरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार तमिन इक्बाल याचा भाऊ आणि माजी क्रिकेटपटू नफीस इक्बाल याला कोरोना झाल्याची बातमी समोर येत आहे. नफीस हा बांगलादेशच्या स्थानिक संघाचे प्रशिक्षकपद भूषवित होता. BDcritimeने दिलेल्या वृत्तानुसार नफीसची प्रकृती सुधारत आहे.  2003मध्ये इंग्लंडविरुद्ध नफीसनं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुढील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं 27 सामन्यांत चार अर्धशतकं व एक शतक झळकावलं. 2005मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या 121 धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 2006मध्ये त्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Shocking : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण 

बीसीसीआयवर वाढता दबाव; चिनी कंपनींसोबतचे करार संपुष्टात आणा, अन्यथा...

माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम

बाबो; 20 सेकंदाचा 'सोपा' व्यायाम जमतो का बघा; हरभजन सिंगनं शेअर केलेला Video Viral

चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक

युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबांगलादेश