Join us

"कोहलीपेक्षा चांगला ODI खेळाडू बघितला नाही..."; दोन वेळा वर्ल्ड कप जिंकूण देणारा कर्णधारही विराटच्या प्रेमात पडला!

Ricky Ponting about Virat kohli : चॅम्पियन्स ट्रॉफीतील रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात विराटने नाबाद १०० धावांची खेळी केली होती. त्याने वनडे कारकिर्दित आतापर्यंत ५१ शतके ठोकली आहेत. कोहलीच्या या खेळीच्या बळावर भारताने हा सामना ६ विकेट राखून जिंकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:25 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी-२०१५ मध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात विराटने सुरेख शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनेही (Ricky Ponting) त्याचे तोंडभरून गोडवे गायले आहेत. "आपण वनडे क्रिकेटमध्ये (ODI) विराट कोहलीपेक्षा चांगला खेळाडू बघितला नाही," असे पॉन्टिंगने म्हटले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात विराटने नाबाद १०० धावांची खेळी केली होती. त्याने वनडे कारकिर्दित आतापर्यंत ५१ शतके ठोकली आहेत. कोहलीच्या या खेळीच्या बळावर भारताने हा सामना ६ विकेट राखून जिंकला होता.

पॉन्टिंगने विराट कोहलीचे मुक्त कंठाने कौतुक केले -आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना पॉन्टिंगने विराट कोहलीचे मुक्त कंठाने कौतुक केले. तो म्हणाला, "मला नाही वाटत की, मी ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीपेक्षा चांगला खेळाडू बघितला. आता तर तो माझ्यापेक्षाही (सर्वाधिक धावा फटकावण्याच्या बाबतीत) पुढे निघून गेला आहे आणि आता केवळ दोनच फलंदाज त्याच्या पुढे आहेत. यामुळे, मला पूर्ण विश्वास आहे की, तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ओळखला जावा, म्हणून स्वतःला सर्वश्रेष्ठ संधी देईल."

...यावरून सचिन किती उत्कृष्ट फलंदाज होता, हे समजते -पोंटिंग पुढे म्हणाला,"तो नक्कीच शारीरिकदृष्ट्या पूर्वीप्रमाणे फीट आहे आणि आपल्या खेळासाठी कठोर मेहनतही करत असतो. जेव्हा आपण यासंदर्भात विचार करता तेव्हा आश्चर्य वाटते. विराट गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र, तरीही, तो अजूनही तेंडुलकरपेक्षा ४००० धावांनी मागे आहे. यावरून सचिन किती उत्कृष्ट फलंदाज होता, हे तर समजतेच, शिवाय तो किती काळ खेळला हेही दिसून येते. मात्र, विराटमध्ये अजूनही धावांची भूक असेल, तर तो तेंडुलकरचा विक्रम मोडू शकणार नाही, असे मी कधीही म्हणणार नाही."

सचिनच्या तुलनेत आणखी 4341 धावांनी मागे आहे विराट -महत्वाचे म्हणजे, विराटने अपल्या शतकी खेळीदरम्यान वनडे क्रिकेटमध्ये 14000 धावा पूर्ण केल्या आहेत. आता सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेच्या कुमार संगकारानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरचा (18426) विचार करता, विराट कोहली (14085 रन) त्याच्या तुलनेत आणखी 4341 धावांनी मागे आहे. विराट सध्या 36 वर्षांचा आहे.  

पॉन्टिंगच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तो टेस्ट आणि वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने या दोन्ही फॉरमॅटमध्ये 13,000 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, त्याने आपल्या नेतृत्वा ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वनडे वर्ल्ड कप (2003 आणि  2007) जिंकूण दिला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघसचिन तेंडुलकर