क्विन्सलँड्स : प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारा आॅस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन याला अपघात झाला आहे. क्विन्सलँड्स येथील एका बीचवर मुलासह सर्फिं ग करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हा अपघात घडला. यामुळे त्याच्या पाठीच्या कण्याला आणि गळ्याला दुखापत झाली आहे. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
‘अपघातानंतर मला साहाय्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. बेन आणि स्यू यांचे विशेष आभार. त्यांनी प्राथमिक उपचार करून मला कमी वेळेत रुग्णालयात दाखल केले.
आता प्रकृतीत सुधारणा होत
आहे,’ असे हेडनने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.
हेडनच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असली तरी, त्याच्या डोक्याला मोठी इजा झाली असून गळ्याच्या खाली फ्रॅक्चरही झाले आहे. हेडनचा असा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०००मध्ये मासेमारी करताना त्याची बोट बुडू लागली आणि त्याला काही किलोमीटर पोहावे लागले. त्या वेळी त्याच्यासोबत आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अॅण्ड्र्यू सायमंड्सही होता. हेडनने १०३ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ९ टी२० सामन्यांत आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. (वृत्तसंस्था)