Join us

ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजाचा अपघात, शरीरभर जखमा

प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरायला भाग पाडणारा ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन याचा अपघात झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:36 IST

Open in App

क्विन्सलँड्स : प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरायला भाग पाडणारा ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन याचा अपघात झाला आहे. क्विन्सलँड्स येथील एका बीचवर मुलासह सर्फींग करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हा अपघात झाला. त्याच्या पाठीच्या कण्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. 

''अपघातानंतर मला साहाय्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. बेन आणि स्यू यांचे विशेष आभार. त्यांनी प्राथमिक उपचार करून मला जलद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता प्रकृतीत सुधारणा होत आहे,'' असे हेडनने इंस्टाग्रामवर लिहिले आहे. हेडनचा असा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2000 मध्ये मासेमारी करताना त्याची बोट बुडू लागली आणि त्याला काही किलोमीटर पोहावे लागले. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा अँड्य्रु सायमंडही होता. हेडनने 103 कसोटी, 161 वनडे आणि 9 ट्वेंटी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

टॅग्स :आॅस्ट्रेलिया