Join us  

कृपया ऑस्ट्रेलियाविरुद्ध नको! ब्रेट लीनं केली रोहित शर्माकडे Special विनंती

कोरोना व्हायरसच्या संकटानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी खेळाडू उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 1:16 PM

Open in App

2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांत मुरली विजयला सलामीला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं रोहित शर्माला गब्बर शिखर धवनसह सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय रोहितच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आणि मर्यादित षटकांच्या सामन्यातील यशस्वी सलामीवीरांमध्ये रोहितचं नाव घेतलं जात आहे. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असलेला रोहित जगातला एकमेव फलंदाज आहे. त्यानं पहिलं द्विशतकं 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलं, त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध दोन द्विशतकांची नोंद केली आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात सर्व क्रिकेटपटूंना घरीच थांबावं लागत आहे. जवळपास अडीच महिने खेळाडू क्रिकेटपासून दूर आहेत आणि मैदानावर पुन्हा कमबॅक करण्यासाठी सर्वच आतूर आहेत. रोहितही मैदानावर जोरदार फटकेबाजी करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर रोहितची आतषबाजी पाहण्यासाठी सर्वच आतूर आहेत. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली यानं हिटमॅनकडे एक स्पेशल विनंती केली आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या Cricket Connected या कार्यक्रमात ब्रेट ली बोलत होता. ''त्यानं आणखी अनेक द्विशतक झळकवावी, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध नको... कृपया ऑस्ट्रेलिया सोडून अन्य कोणत्याही म्हणजे पाकिस्तान, वेस्ट इंडिय आदी संघांविरुद्ध द्विशतक झळकव,''अशी विनंती ब्रेट ली याने केली.

दरम्यान,  भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा यंदा वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरला आहे, पण कोविड-१९ महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याच्या फिटनेस चाचणीला उशीर होत आहे. रोहितने शनिवारी ला लीगाच्या फेसबुक लाईव्ह सत्रादरम्यान म्हटले की,‘लॉकडाऊनपूर्वीच मी पुनरागमनासाठी जवळजवळ पूर्णपणे सज्ज झालो होतो. पूर्ण आठवडाभर माझी फिटनेस चाचणी होणार होती, पण त्यानंतर लॉकडाऊन झाले आणि आता पुन्हा नव्याने पुनरागमन करावे लागेल.’ तो पुढे म्हणाला,‘सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर मला एनसीएमध्ये जाऊन फिटनेस चाचणी द्यावी लागेल. त्यात यशस्वी ठरल्यानंतरच मला संघासोबत जुळता येईल.’ 

रोहित म्हणाला,‘मला सरावाला पुन्हा सुरुवात करण्यास वेळ लागू शकतो. मुंबईच्या तुलनेत अन्य स्थळांवर लवकर सरावाला सुरुवात होऊ शकते, असे मला वाटते. कारण येथे कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. माझ्या तुलनेत अन्य सहकारी सरावाचे व्हिडिओ माझ्यापूर्वी शेअर करतील, असे मला वाटते. लॉकडाऊनदरम्यान मी आहार व फिटनेसवर लक्ष दिले.’

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू

OMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट!

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड

पाकिस्तानच्या प्रशिक्षकानं सुचवला जुगाड; चेंडूला थूंकी लावण्याची गोलंदाजांची मोडेल सवय!

युवी, भज्जीकडे मदत मागायची अन् त्यांच्या पंतप्रधानांवर टीका करायची; आफ्रिदीवर पाक खेळाडू बरसला

टॅग्स :रोहित शर्माआॅस्ट्रेलिया