Join us

इम्रान खानच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची दैना; 57 धावांत 9 फलंदाज माघारी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ट्वेंटी-20 मालिकेत पराभवाचा सामना करावा लागलेला पाकिस्तानचा संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 15:10 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ट्वेंटी-20 मालिकेत पराभवाचा सामना करावा लागलेला पाकिस्तानचा संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्ताननं सराव सामन्यात आपला दम दाखवला आहे. पाकिस्तानी विरुद्ध ऑस्ट्रेलिया A अशा सामन्यात सध्या पाकचे पारडे जड पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघानं 428 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात इम्रान खानच्या भेदक माऱ्यासमोर त्यांची दैना उडाली. त्यांचे 9 फलंदाज अवघ्या 57 धावांत माघारी परतले. यापैकी निम्मा संघा इम्रान खाननं गुंडाळला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आले. पण, असाद शफीक आणि बाबार आझम यांनी शतकी खेळी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. आसदनं 245 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार खेचून 119 धावा केल्या. आझमनं 197 चेंडूंत 24 चौकारांसह 157 धावा केल्या. दोन्ही खेळाडू रिटायर हर्ट होत तंबूत परतले. यसिर शाहनं 70 चेंडूंत 53 धावा करताना पाकिस्तानच्या धावांत भर घातली. 

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया A संघाचे 9 फलंदाज 57 धावांत माघारी परतले. मार्कस हॅरिस, जो बर्न्स, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हीस हेड, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट आणि अॅलेक्स करी हे तगडे फलंदाज इम्रान खानच्या भेदक माऱ्यासमोर अपयशी ठरले.  

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया