कोलकाता : वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलच्या भेदक माºयापुढे आघाडीच्या फळीने नांगी टाकताच भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या सलामीलाच धक्के बसले. पाऊस आणि अंधूक सूर्यप्रकाशामुळे गुरुवारी केवळ ११.५ षटकांचा खेळ शक्य झाला. त्यातही भारताची अवस्था ३ बाद १७ अशी झाली. लकमलने सहा षटकांत एकही धाव न देता तिन्ही गडी बाद केले.
दिवसाचा खेळ संपण्याआधीच अंधूक सूर्यप्रकाशामुळे पंचांनी थांबण्याचा निर्णय घेतला तेव्हा चेतेश्वर पुजारा आठ धावांवर नाबाद होता. दुसºया टोकावर असलेल्या अजिंक्य रहाणेने खाते उघडले नव्हते.
साडेतीन तास विलंब...
मैदानावर चिखल झाल्याने खेळ साडेतीन तास उशिरा सुरू करण्यात आला. लंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलने ढगाळ वातावरण पाहून नाणेफेक जिंकताच क्षेत्ररक्षण घेतले. चार स्लिप आणि गली असे क्षेत्ररक्षण सजविणाºया लकमलने त्याचा निर्णय खरा ठरविला. ईडनच्या गवताळ खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेत पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला यष्टिरक्षक निरोशन डिकवेलाकडे झेल देण्यास बाध्य केले. मधल्या यष्टीवरून बाहेर जाणाºया चेंडूवर राहुल बाद झाला. यासोबतच सलग सात अर्धशतके ठोकण्याची त्याची कामगिरी
खंडित झाली.
एका चेंडूनंतर पुजारा भाग्यवान ठरला. लकमलचा इनस्विंगर यष्टीच्या वरून निघून गेला. सलामीवीर शिखर धवन याने लाहिरू गमागेला सामन्यात पहिला चौकार मारला. पण पुढच्या षटकात लकमलने त्याचाही अडथळा दूर केला. पुजाराने गमागेला दोन चौकार ठोकताच भारताने ४३ मिनिटांत आठ षटकांत १७ पर्यंत मजल गाठली. त्याच वेळी पंचांनी अंधूक प्रकाशामुळे चहापानासाठी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. खेळ सुरू होताच लकमलने कर्णधार विराट कोहली याला पायचित करीत तिसरा धक्का दिला. कोहलीने डीआरएसचा आधार घेतला. पण तिसºया पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय योग्य ठरविला. याच षटकात रहाणेविरुद्ध लकमलने पायचितचे अपील केले, पण पंचांनी अपील फेटाळले. लकमलने पाठोपाठ सहा षटके निर्धाव टाकली. गमागेने पाच चेंडू टाकल्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
धाव न देता ३ बळी घेणारा लकमल दुसरा गोलंदाज
वेगवान गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन करताना श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने गुरुवारी भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ३ बळी घेतले. कसोटी डावात धाव न देता ३ बळी घेणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये धाव न देता ३ बळी घेण्याचा पराक्रम आॅस्ट्रेलियाच्या रिची बेनोने भारताविरुद्ध दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर केला होता. त्या वेळी बेनोने ३.४ षटकांत धाव न देता ३ बळी घेत यजमान संघाला १३५धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी डिसेंबर २०१० मध्ये कँडी येथे विंडीजच्या गेलला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा तो श्रीलंकेचा एकमेव गोलंदाज आहे.
हे कसोटीपटू झाले पहिल्याच चेंडूवर बाद...-
सलामीवीर लोकेश राहुल आज पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रि केट सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल हा सहावा भारतीय सलामीवीर आहे. यापूर्वी सुनील गावसकर, वासिम जाफर, सुधीर नाईक, डब्ल्यू. व्ही. रमण आणि शिवसुंदर दास हे पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत.
सुनील गावसकर तब्बल तीन वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. कोलकाता येथे पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल तिसरा सलामीवीर ठरला. यापूर्वी माजी सलामीवीर सुधीर नाईक आणि सुनील गावसकर ईडनवर पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. या दोन्ही सलामीवीरांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी तंबूचा रस्ता दाखवला होता.
१९८३ मध्ये वेस्ट इंडिजविरु द्ध कोलकाता येथे सुनील गावसकर मार्शलच्या गोलंदाजीवर बाद झाले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २४९ आणि दुसºया डावात अवघ्या ९० धावा केल्या. भारताने हा सामना ४६ धावांनी गमावला होता. गावसकर पाकिस्तानविरु द्ध इम्रान खान आणि इंग्लंडविरु द्ध अर्नाल्डच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर बाद झाले.
इतर फलंदाजांमध्ये शिवसुंदर दास हा वेस्ट इंडिजच्या डिलोनचा बळी ठरला. तर जाफरला बांगलादेशच्या मूर्तझाने पहिल्या चेंडूवर तंबूत पाठवले. न्यूझीलंडविरु द्ध रमण पहिल्याच चेंडूवर बाद झाले.
ही तर सुरुवात आहे : रत्नायके
पावसाचा व्यत्यय आलेल्या पहिल्या कसोटीत भारताला सुरुवातीलाच जोरदार धक्के देणाºया श्रीलंकन संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक रुमेश रत्नायके यांनी ही तर फक्त सुरुवात आहे आणि अजून खूप काम करणे बाकी असल्याचे म्हटले आहे. रत्नायके म्हणाले, ‘जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे आमचे खेळाडू आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. प्रदीर्घ काळानंतर मी इतकी चांगली सुरुवात पाहिली. खेळपट्टीतून मदत मिळत आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक आहे हे आम्हाला माहीत आहे; परंतु अद्याप काम पूर्ण झाले नाही. ही तर फक्त सुरुवात आहे.’ ते म्हणाले, ‘निश्चितच नाणेफेक जिंकणे चांगले ठरले. पुढील एक अथवा दीड दिवसांपर्यंत खेळपट्टीकडून मदत मिळेल.
धावफलक
भारत पहिला डाव : लोकेश राहुल झे. डिकवेला गो. लकमल ००, शिखर धवन त्रि. गो. लकमल ८, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ८, विराट कोहली पायचित गो. लकमल ००, अजिंक्य रहाणे खेळत आहे ००, अवांतर : १, एकूण : ११.५ षटकांत ३ बाद १७ धावा. गडी बाद क्रम : १/०, २/१३, ३/१७. गोलंदाजी लकमल ६-६-०-३, गमागे ५.५-१-१६-०.