Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो व्हायरल 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत काम करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 09:04 IST

Open in App

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत काम करत आहे. त्याने बुधवारी लष्करात सेवा देण्यास सुरुवात केली. त्यातच धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. तसेच धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील प्रत्येक विभागातून आलेले सैनिक आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोत धोनी लष्करी जवानांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. क्रिकेटचे मैदान गाजवणारा आपल्यासोबत काम करत असल्याने जवानांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांना त्यांच्याकडे असलेल्या बॅटवर धोनीची स्वाक्षरी व त्याच्यासोबत फोटो घेण्याचा मोह देखील आवरता आलेला नाही. 

धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवानभारत