Arjun Tendulkar Saania Chandhok Latest Photo: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेट जगतात अजून फारसे नाव कमावलेले नाही. पण बुधवार संध्याकाळपासून तो त्याच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनचा साखरपुडा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी हिच्यासोबत झाला. मुंबईमध्ये अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाला. या समारंभात दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र उपस्थित होते. मोजक्या निमंत्रितांमध्ये हा साखरपुडा पार पडला. तेव्हा सचिन तेंडुलकरची होणारी सून कशी दिसते, हे पाहण्यासाठी सारे चाहते उत्सुक आहेत. त्याचदरम्यान, सानिया चांडोकचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांनीही लग्न केले आहे. अर्जुनची भावी पत्नी सानिया ही त्याची बहीण सारा तेंडुलकर हिची खास मैत्रिण आहे. त्या दोघी यापूर्वीही अनेकदा एकत्र दिसल्या आहेत. नुकतीच सारा तेंडुलकरने मुंबईच्या अंधेरीत पिलेट्स अकॅडमी सुरु केली. याचे फोटो तिने सोशल मीडियावर टाकले. त्यात तेंडुलकरांची होणारी सून सानिया चांडोक हिची साखरपुड्यानंतरचा पहिली झलक दिसली. लेटेस्ट फोटोत ती सारा आणि इतर मैत्रिणींसोबत पोज करताना दिसली.
-----------
सानिया अर्जुनपेक्षा वयाने मोठी...
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन तेंडुलकरने १३ ऑगस्ट २०२५ रोजी सानिया चांडोकशी साखरपुडा केला. अर्जुन तेंडुलकरचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला होता आणि तो सध्या २५ वर्षांचा आहे. तर सानिया चांडोकचा जन्म २३ जून १९९८ रोजी झाला होता आणि ती सध्या २६ वर्षांची आहे. म्हणजेच अर्जुन आणि सानियाच्या वयात एक वर्षापेक्षा जास्त अंतर आहे. सानिया अर्जुनपेक्षा १ वर्षाने मोठी आहे तर अर्जुनची मोठी बहीण सारा तेंडुलकर ३ वर्षांनी मोठी आहे.