Join us

FIFA Football World Cup 2018 : कोलंबियाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी फक्त 45 मिनिटांचा अवधी

कोलंबियासारख्या नावाजलेल्या संघाला जर फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांच्याकडे फक्त 45 मिनिटांचा अवधी असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 20:28 IST

Open in App
ठळक मुद्देकोलंबियाला जर बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना या सामन्यात विजय मिळणे अनिवार्य आहे.

मॉस्को : कोलंबियासारख्या नावाजलेल्या संघाला जर फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांच्याकडे फक्त 45 मिनिटांचा अवधी असेल. कारण सेनेगल विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्याच्या पहिल्या सत्रात त्यांना एकही गोल करता आलेला नाही. पहिल्या सत्रात कोलंबिया आणि सेनेगल यांची 0-0 अशी बरोबरी आहे.

सध्याच्या घडीला ' एच ' गटामध्ये सेनेगलचा संघ पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर कोलंबियाचा संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जर हा सामना बरोबरीत सुटला तर सेनेगल बाद फेरीत पोहोचेल. त्यामुळे कोलंबियाला जर बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना या सामन्यात विजय मिळणे अनिवार्य आहे.

टॅग्स :फिफा विश्वचषक २०१८कोलंबियाफुटबॉल