मुंबई : फलंदाजांचा कर्दनकाळ समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने निवृत्तीचा निर्णय आज जाहीर केली. स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टेनने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी मिळवले होते. आयसीसीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.