Join us  

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाना रिहानाने समर्थन दिले आहे.

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 03, 2021 9:19 AM

Open in App
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय स्थरावर प्रसिद्ध असलेली बारबाडोसची पॉप स्टार रिहाना, हिला शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्याने टीकांचा सामना करावा लागत आहे. कंगनानंतर आता भारताचा माजी स्टार क्रिकेटर प्रज्ञान ओझानेही तिला जबरदस्त फटकारले आहे.६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रसिद्ध असलेली बारबाडोसची पॉप स्टार रिहाना, हिला शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्याने टीकांचा सामना करावा लागत आहे. तीने भारताच्या अंतर्गत प्रकरणात लक्ष घातल्याने, कंगनानंतर आता भारताचा माजी स्टार क्रिकेटर प्रज्ञान ओझानेही तिला जबरदस्त फटकारले आहे. "माझ्या देशाला देशातील शेतकऱ्यांचा अभिमान आहे आणि ते किती महत्वाचे आहेत हेही माहित आहे," असे प्रज्ञान ओझाने रिहाच्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटले आहे. 

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या गोलंदाजाने पुढे म्हटले आहे, "मला विश्वास आहे, ही हे प्रकरण लवकरच मार्गी लागेल. आम्हाला आमच्या अंतर्गत प्रकरणांत कुण्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपाची गरज नाही." 

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

काय म्हणाली रिहाना -केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाना रिहानाने समर्थन दिले आहे. यापार्श्वभूमीवर रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? #FarmersProtest."

कंगनाचं उत्तर -रिहानाच्या ट्विटला उत्तर देत कंगनाने म्हटले आहे, की यासंदर्भात यामुळे चर्चा होत नाहीय, कारण हे शेतकरी नाही, तर दहशतवादी आहेत. ज्यांची भारत तोडण्याची इच्छा आहे. म्हणजे चीन सारखे देश आपल्या राष्ट्रावर कब्जा करतील आणि यूएसए सारखी चायनीज कॉलनी तयार करतील. तू शांत रहा मूर्ख. आम्ही तुझ्या सारख्ये मूर्ख नाही, की आपल्या देशाला विकू.

अभी मजा आयेगा ना बिंदू...! रिहानाच्या ट्विटनंतर कंगना राणौत झाली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सीमेवर तणावपूर्ण स्थिती -प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाले होते. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करत आहे. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. दिल्लीतील निरनिराळ्या सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर खिळेदेखील ठोकण्यात येत आहे.  

टॅग्स :शेतकरी संपदिल्लीकंगना राणौतबॉलिवूड