Join us

IPL 2021 Venues : आयपीएल सामन्यांच्या ठिकाणांवरून फ्रँचायझी नाराज; मुख्यमंत्र्यांची BCCIकडे विनंती 

IPL 2021 Venues : यंदाची आयपीएल भारतामध्येच खेळवण्याचा BCCI चा प्रयत्न आहे. यासाठी एकूण ६ स्थळांचा विचार होत असल्याची चर्चा आहे

By स्वदेश घाणेकर | Updated: March 3, 2021 14:47 IST

Open in App

IPL 2021 Venues : गेल्यावर्षी सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३ व्या पर्वाचे यूएईत यशस्वी आयोजन केल्यानंतर यंदाची आयपीएल भारतामध्येच खेळवण्याचा BCCI चा प्रयत्न आहे. यासाठी एकूण ६ स्थळांचा विचार होत असल्याची चर्चा आहे . त्याचवेळी, मुंबईतील सामने प्रेक्षकांविना होणार असून महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतरच सामने मुंबईत आयोजित होतील, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली. BCCI नं मुंबईसह दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु व कोलकाता या स्थळांचा विचार केला आहे. पण, आता या ठिकाणांवरून फ्रँचायझींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पंजाब किंग्स ( Punjab Kings) चे सीईओ सतीश मेनन यांनी थेट बंड पुकारले असून पंजाबचे मुख्यमंत्री  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही उडी घेतली आहे.   IPLला नाव ठेवल्यानंतर झाली टीका अन् डेल स्टेननं मागितली माफी, अजिंक्य रहाणेनंही झापलं

मेनन यांनी सांगितले की,''कोरोनामुळे जर पंजाबमध्ये आयपीएल सामने होणार नसतील तर देशभरात कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. अशात चंडीगढ आणि मोहाली येथे तुलनेनं कमी रुग्ण आहेत. त्यामुळे कोणत्या आधारावर दुसऱ्या ठिकाणांची निवड केली, हेच समजणं कठीण झालं आहे.'' पंजाब किंग्स फ्रँचायझीनं २६ फेब्रुवारीला यासंदर्भात BCCIला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कोणत्या आधारावर ठिकाणांची निवड केली, हा प्रश्न विचारला आहे. RCBच्या आजी-माजी खेळाडूंची फटकेबाजी; Glenn Maxwellनं एका षटकात चोपल्या २८ धावा अन् मोडली खूर्ची पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही पंजाबला आयोजनाचा मान न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी आयपीएलच्या सामन्यांसाठी राज्य सरकारकडून सर्व सुविधा आणि खेळाडूंच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेईल असे आश्वासन दिलं. त्यांनी BCCIकडे निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती केली. 

टॅग्स :आयपीएलकिंग्स इलेव्हन पंजाब