Dale Steyn Apologies : IPLला नाव ठेवल्यानंतर झाली टीका अन् डेल स्टेननं मागितली माफी, अजिंक्य रहाणेनंही झापलं

Dale Steyn apologies, My words were never intended to be insulting of any leagues; Ajinkya Rahane also react on Steyn’s comments: माझ्यासह अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीत आयपीएलचे महत्त्व अधिक आहे. मला कोणत्याही लीगची बदनामी करायची नव्हती - डेल स्टेन

By स्वदेश घाणेकर | Published: March 3, 2021 01:49 PM2021-03-03T13:49:54+5:302021-03-03T13:50:29+5:30

whatsapp join usJoin us
Dale Steyn apologies, My words were never intended to be insulting of any leagues; Ajinkya Rahane also react on Steyn’s comments | Dale Steyn Apologies : IPLला नाव ठेवल्यानंतर झाली टीका अन् डेल स्टेननं मागितली माफी, अजिंक्य रहाणेनंही झापलं

Dale Steyn Apologies : IPLला नाव ठेवल्यानंतर झाली टीका अन् डेल स्टेननं मागितली माफी, अजिंक्य रहाणेनंही झापलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier Leage मध्ये फक्त आणि फक्त पैशांचा विचार केला जातो. तिथे क्रिकेटला कमी महत्त्व दिले जाते, या विधानानंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन ( Dale Steyn) याच्यावर टीका झाली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) खेळण्यापेक्षा पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) खेळणे अधिक फायद्याचे आहे, असे मत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) माजी गोलंदाजनं व्यक्त केलं होतं. त्याबाबत टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याला विचारले असता त्यानं मोजक्या शब्दात स्टेनचे कान टोचले होते. आता डेल स्टेननं माफी मागितली आहे. RCBच्या आजी-माजी खेळाडूंची फटकेबाजी; Glenn Maxwellनं एका षटकात चोपल्या २८ धावा अन् मोडली खूर्ची

त्यानं ट्विट केलं की,''माझ्यासह अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीत आयपीएलचे महत्त्व अधिक आहे. मला कोणत्याही लीगची बदनामी करायची नव्हती किंवा तुलना करायची नव्हती. सोशल मीडिया आणि माझ्या वाक्यातून तसे ते भासवण्यात आली. तरीही माझ्यामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्यांची मी माफी मागतो.''  


आयपीएलमध्ये डेल स्टेन डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि RCB या संघांकडून खेळला आहे. २०२१च्या आयपीएलमधून त्यानं माघार घेतली आणि तो सध्या PSL मध्ये सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखालील क्युएत्ता कलंदर्स संघाकडून खेळत आहे. ११ दिवसांचा कसोटी सामना, १९८१ धावा, ६ शतकं अन् विजयासाठी ४२ धावांची गरज असताना खेळाडू ट्रेन पकडून परतले 

काय म्हणाला डेल स्टेन?
एक्स्प्रेस ट्रीबूनशी बोलताना त्यानं आयपीएलच्या १४व्या पर्वातून माघार घेण्यामागचं कारण सांगितले. तो म्हणाला,'' मला काही काळ विश्रांती हवी होती. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणं हे अन्य फ्रँचायझी लीगपेक्षा एक खेळाडू म्हणून अधिक फायद्याचे आहे. आयपीएलमध्ये खेळताना मोठा चमू असतो, मोठी नावं असतात, खेळाडूंसाठी मोजलेल्या पैशांवर अधिक भर दिला जातो आणि अशात क्रिकेट कुठेतरी मागे पडतं.'' 'पौछा मारू या झाडू?'; Jasprit Bumrahच्या लग्नाच्या चर्चांवर युवराज सिंगनं केलं ट्रोल

''पाकिस्तान सुपर लीग किंवा श्रीलंकन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते. मला इथे येऊन थोडेच दिवस झाले आहेत आणि इथे भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला फक्त क्रिकेटबद्दल जाणून घ्यायचं असतं. आयपीएलमध्ये मी हे सर्व विसरतो आणि आयपीएलमध्ये यंदा किती पैसा मिळणार, हाच एक प्रमुख मुद्दा चर्चिला जातो,'' असेही स्टेन म्हणाला.

अजिंक्य रहाणेचं सडेतोड उत्तर 
चौथ्या कसोटीपूर्वी आलेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्यला स्टेनच्या वक्तव्याबद्दल विचारले गेले. त्यावर तो म्हणाला,''इथे मी चौथ्या कसोटीवर चर्चा करण्यासाठी आलो आहे. आयपीएल ही प्रत्येक खेळाडूला स्वतःला आणखी चांगला खेळाडू होण्यासाठी मदत करते. आयपीएलनं अनेक भारतीय खेळाडूंना संधी दिलीय आणि ते आज चांगली कामगिरी करत आहेत.   जसप्रीत बुमराहची 'लाईफ पार्टनर' कोण?; या अभिनेत्रीचं नाव चर्चेत

Web Title: Dale Steyn apologies, My words were never intended to be insulting of any leagues; Ajinkya Rahane also react on Steyn’s comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.