'Paucha marun yah jhadu': Yuvraj Singh hilariously trolls Jasprit Bumrah amid pacer's wedding rumours | 'पौछा मारू या झाडू?'; Jasprit Bumrahच्या लग्नाच्या चर्चांवर युवराज सिंगनं केलं ट्रोल

'पौछा मारू या झाडू?'; Jasprit Bumrahच्या लग्नाच्या चर्चांवर युवराज सिंगनं केलं ट्रोल

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) यानं भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सक्रीय असलेला युवी नेहमीच खेळाडूंची फिरकी घेत असतो आणि यावेळी जसप्रीत बुमराह त्याच्या तावडीत सापडला. बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या ( India vs England Test) चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी BCCIकडून सुट्टी मंजूर करून घेतली. त्यामुळे तो आता चौथ्या कसोटीत खेळणार नाही, तसेच पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघातही त्याला विश्रांती दिली गेली आहे. त्यात ANIनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बुमराहनं लग्नासाठी ही सुट्टी घेतल्याचे समोर आले. त्यावरून युवीनं त्याची फिरकी घेतली. ( Yuvraj Singh has trolled  Jasprit Bumrah ) 

लग्नाची चर्चा सुरू असताना बुमराहनं सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट केला. त्यावर कमेंट करताना युवीनं 'पौछा मारू या झाडू?', अशी कमेंट करून त्याला ट्रोल केलं.    जसप्रीत बुमराहची 'लाईफ पार्टनर' कोण?; या अभिनेत्रीचं नाव चर्चेत


बीसीसीआयच्या सूत्रांनी काय सांगितले?
"लवकरच लग्न करणार असल्याचे त्याने BCCI ला कळवले आहे. या आनंदाच्या प्रसंगाच्या तयारीसाठी त्याने ही सुट्टी घेतली आहे," असे वृत्त ANI ने सूत्रांचा हवाला देऊन प्रसिद्ध केले आहे. 


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Paucha marun yah jhadu': Yuvraj Singh hilariously trolls Jasprit Bumrah amid pacer's wedding rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.