चाहते आज वॉर्नला अंतिम निरोप देणार

मेलबोर्नच्या क्रिकेट मैदानावर हजारो चाहत्यांच्या उपस्थिती वॉर्नचा श्रद्धांजली सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 05:46 IST2022-03-30T05:45:58+5:302022-03-30T05:46:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Fans will pay their last respects to Warne today | चाहते आज वॉर्नला अंतिम निरोप देणार

चाहते आज वॉर्नला अंतिम निरोप देणार

ब्रिस्बेन : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने आणि मैदानाबाहेर आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाने अनेकांना भुरळ घालणाऱ्या शेन वॉर्नला आज अंतिम निरोप देण्यात येणार आहे. मेलबोर्नच्या क्रिकेट मैदानावर हजारो चाहत्यांच्या उपस्थिती वॉर्नचा श्रद्धांजली सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
४ मार्चला शेन वॉर्न थायलंडमधील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. याआधी काहीच दिवसांपूर्वी वॉर्नचा श्रद्धांजली सोहळा त्याच्या अगदी जवळच्या परिचितांच्या उपस्थितीत पार पडला होता. आज चाहत्यांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. वॉर्नने आपला ७०० वा कसोटी बळी याच मैदानावर घेतला होता. त्यामुळे याच ठिकाणी त्याला अंतिम विदाई देण्याचे त्याच्या मृत्यूपश्चात ठरविण्यात आले होते. 

सचिन वाहणार वॉर्नला श्रद्धांजली
भारताचा दिग्गज फलंदाज आणि वॉर्नचा खास मित्र असलेला सचिन तेंडुलकर आभासी पद्धतीने आजच्या सोहळ्याला उपस्थित राहून वॉर्नला श्रद्धांजली वाहणार आहे. वॉर्नबाबत बोलताना सचिन म्हणाला, वॉर्नच्या जाण्याची बातमी स्वीकारायला अजूनही मन तयार नाही. तो माझ्यासाठी मैदानावर कठीण प्रतिस्पर्ध्यांपैकी एक होता. त्याच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी मला आधी निश्चितच अभ्यास करावा लागायचा. मैदानाबाहेर मात्र तो एक दिलदार, दिलखुलास मित्र होता.

वॉर्न ऑस्ट्रेलियाचा सर्वात खास खेळाडू - लारा
वेस्ट इंडियन दिग्गज ब्रायन लारानेही वॉर्नच्या आठवणींना उजाळा देताना त्याला ‘ऑस्ट्रेलियाचा सर्वांत खास खेळाडू’ म्हणून संबोधले. तो पुढे म्हणाला, वॉर्नची गोलंदाजी खेळण्याचे नेहमीच आव्हान असायचे. त्याची हार न मानण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी होती.

Web Title: Fans will pay their last respects to Warne today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.