Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान सुपर लीगमध्ये फलंदाज मुंबई इंडियन्सचे 'ग्लोज' घालून मैदानावर उतरला!

रुथरफोर्ड मुंबई इंडियन्सकडून IPL 2020मध्ये एकही सामना खेळला नाही.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 17, 2020 15:14 IST

Open in App

वेस्ट इंडिजचा फलंदाज शेर्फाने रुथरफोर्ड इंडियन प्रीमिअर लीगनंतर UAE येथून पाकिस्तानात दाखल झाला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो कराची किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. पण, या लीगमध्ये मैदानावर फलंदाजीसाठी जेव्हा तो उतरला तेव्हा त्याच्या हातात मुंबई इंडियन्स संघाचे ग्लोज पाहायला मिळाले. क्वालिफायर १ सामन्यात कराची किंग्स आणि मुल्तान सुल्तान सामन्यात हा प्रसंग पाहायला मिळाला. 

रुथरफोर्ड मुंबई इंडियन्सकडून IPL 2020मध्ये एकही सामना खेळला नाही. मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या १३व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्स राखून पराभूत करताना पाचव्यांदा जेतेपद पटकावले. MIनं संधी न दिलेल्या रुथरफोर्डला कराची किंग्सने अंतिम ११मध्ये स्थान दिले. पण, मुंबई इंडियन्सचे ग्लोज घालून मैदानावर उतरल्यानं सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला.  Video : पहिल्याच चेंडूवर शाहिद आफ्रिदीचा उडवला त्रिफळा अन् नंतर मागितली माफी!

याआधीही रुथरफोर्ड पाकिस्तानात दाखल झाला, तेव्हा त्यानं मुंबई इंडियन्सचे किट घातला होता. विमानतळावरील त्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्याला तीन चेंडूंत १ धाव करता आली.  दोन्ही संघांना 141 धावांवर समाधान मानावे लागल्यानं सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. कराची किंग्सनं हा सामना जिंकला.   

टॅग्स :पाकिस्तानमुंबई इंडियन्स