Video : पहिल्याच चेंडूवर शाहिद आफ्रिदीचा उडवला त्रिफळा अन् नंतर मागितली माफी!

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) शाहिद आफ्रिदीचं व्यावसायिक क्रिकेटमधील कमबॅक फार चांगलं झालेलं नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: November 16, 2020 11:12 AM2020-11-16T11:12:32+5:302020-11-16T11:12:51+5:30

whatsapp join usJoin us
WATCH: Haris Rauf apologises with folded hands after cleaning up Shahid Afridi with a ripper in PSL 2020 | Video : पहिल्याच चेंडूवर शाहिद आफ्रिदीचा उडवला त्रिफळा अन् नंतर मागितली माफी!

Video : पहिल्याच चेंडूवर शाहिद आफ्रिदीचा उडवला त्रिफळा अन् नंतर मागितली माफी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) शाहिद आफ्रिदीचं व्यावसायिक क्रिकेटमधील कमबॅक फार चांगलं झालेलं नाही. प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात १२ धावा करणाऱ्या आफ्रिदीला दुसऱ्या सामन्यात भोपळाची फोडता आला नाही. पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रॉफ यानं एलिमिनेटर २ सामन्यात लाहोर कलंदर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना आपला दबदबा सिद्ध केला. रॉफनं मॅच विनिंग गोलंदाजी करताना मुल्तान सुल्तान संघावर २५ धावांनी विजय मिळवून दिला आणि कलंदर संघानं अंतिम सामन्यात प्रवेश केला. 

एलिमिनेटर २ सामन्यात  लाहोर कलंदर संघानं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८२ धावा केल्या. तमिम इक्बाल ( ३०) आणि फाखर जमान ( ४६) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. डेव्हिड वेसनं २१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार मारून नाबाद ४८ धावा करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. धावांचा पाठलाग करणाऱ्या मुल्तान सुल्तान संघाला रॉफनं धक्के दिले. अॅडम लिथ ( ५०) आणि खुशदील शाह ( ३०) हे वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. रॉफनं ( ३/३०) आणि डेव्हिड वेस ( ३/२७) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदी व दिलबार हुसैन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

१४व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉफनं आफ्रिदीला गोल्डन डकवर बाद केले. आफ्रिदीचा त्रिफळा उडवल्यानंतर रॉफनं त्याची हात जोडून माफी मागितली. 

पाहा व्हिडीओ..


कलंदर व कराची किंग्स यांच्यात PSL 2020ची फायनल होणार आहे. 

 

Web Title: WATCH: Haris Rauf apologises with folded hands after cleaning up Shahid Afridi with a ripper in PSL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.