Hardik Pandya : हार्दिक पांड्याची वर्ल्ड कप संघातून होणार गच्छंती, सततच्या अपयशामुळे निवड समिती निर्णय घेण्याच्या तयारीत

Hardik Pandya fitness यूएईत होत असलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिकनं एकही षटकं टाकलेलं नाही. एवढंच नाही तर मुंबई इंडियन्सनं पहिले दोन सामने त्याला बाकावर बसवून ठेवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:11 PM2021-10-07T16:11:32+5:302021-10-07T16:14:36+5:30

whatsapp join usJoin us
Failure to bowl in IPL could cost Hardik Pandya place in T20 WC squad; Yuzvendra Chahal in line to be rewarded: Report | Hardik Pandya : हार्दिक पांड्याची वर्ल्ड कप संघातून होणार गच्छंती, सततच्या अपयशामुळे निवड समिती निर्णय घेण्याच्या तयारीत

Hardik Pandya : हार्दिक पांड्याची वर्ल्ड कप संघातून होणार गच्छंती, सततच्या अपयशामुळे निवड समिती निर्णय घेण्याच्या तयारीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देयुजवेंद्र चहलची राखीव खेळाडू म्हणून निवड केली जाऊ शकते. वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर त्यानं यूएईत दमदार कामगिरी करताना आतापर्यंत RCBसाठी ११ विकेट्स घेतल्या आहेत. वरूण चक्रवर्थीही पूर्णपणे तंदुरूस्त नाही, त्यामुळे त्याच्या जागीही चहलची निवड होऊ शकते.

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी निवडलेल्या प्रत्येक खेळाडूच्या आयपीएल २०२१मधील कामगिरीवर चाहत्यांची बारीक नजर आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार यांना आलेले अपयश पाहून बीसीसीआयची डोकेदुखी वाढतेय. संघात एकमेव जलदगती अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान पटकावणाऱ्या हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं खूपच निराश केले आहे. आयपीएलमधील अपयशामुळे त्याचे वर्ल्ड कप संघातील स्थानही धोक्यात आले आहे. 

यूएईत होत असलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिकनं एकही षटकं टाकलेलं नाही. एवढंच नाही तर मुंबई इंडियन्सनं पहिले दोन सामने त्याला बाकावर बसवून ठेवले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात हार्दिक गोलंदाजी करत नसल्यानं त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. त्यामुळे निवड समिती लवकरच त्याच्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ( Hardik Pandya fitness) 

TelegraphIndia ने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकच्या मुद्द्यावर निवड समिती संघ व्यवस्थापनाचा दृष्टीकोन जाणून घेणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार क्रिकेट संघांना १० ऑक्टोबरपर्यंत वर्ल्ड कप साठीच्या संघात बदल करता येऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन लवकरच यूएईत दाखल होणार आहे आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केल्यानंतर निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी हार्दिक लकरच चार षटकं टाकेल, असे विधान केलं होतं, परंतु अद्याप त्यानं एकही षटक टाकलेलं नाही. ( Hardik Pandya did't bowled) 

२०२०मध्ये हार्दिकनं दुखापतीतून कमबॅक केले. त्यानं काही वन डे सामने खेळले, परंतु एक फलंदाज म्हणून. पण, ट्वेंटी-२०त भारताला त्याच्याकडून अष्टपैलू कामगिरीची गरज आहे. जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर त्यानं गोलंदाजी केली होती. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची शक्यता अधिक आहे आणि हार्दिकला त्याची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी आता एकच संधी आहे. शार्दूल ठाकूरचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे आणि तो हार्दिकला रिप्लेस करू शकतो. चेन्नई सुपर किंग्सच्या या खेळाडूनं आतापर्यंत यूएईत १० विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर 

भारतीय संघाचे वेळापत्रक

  • २४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • ३१ ऑक्टोबर -   भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • ३ नोव्हेंबर -    भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • ५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • ८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता

Web Title: Failure to bowl in IPL could cost Hardik Pandya place in T20 WC squad; Yuzvendra Chahal in line to be rewarded: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.