IPL 2024, MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत सहज पार केले. इशान किशन व रोहित शर्मा यांनी MI ला आक्रमक सुरूवात करून दिल्यानंतर सूर्यकुमार यादवने १७ चेंडूंत फिफ्टी ठोकून RCB च्या विजयाच्या आशा मावळून टाकल्या. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर मात्र जसप्रीत बुमराह ५ विकेट्स घेऊन हिरो ठरला. पण, या सामन्यात सामानाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी नाणेफेकीत हेराफेरी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय... मुंबई इंडियन्सला जिंकवण्यासाठी टॉस फिक्सिंग केल्याचा दावा नेटिझन्स करत आहेत.
पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ चुकीचा असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये स्पष्ट दिसतंय की श्रीनाथने असं काही केलेलं नाही.
ड्यू प्लेसिस ( ६१) व रजत ( ५०) यांनी ८२ धावा जोडल्या होत्या. ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कार्तिकने २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करून संघाला ८ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. जसप्रीत बुमराहाने २१ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सडून इशानने ३४ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा केल्या. रोहित शर्माने ३८ धावा केल्या. सूर्या १९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर बाद झाला. मुंबईने १५.३ षटकांत ३ बाद १९९ धावा करून मॅच जिंकली. हार्दिकने ६ चेंडूंत नाबाद २१ धावा चोपल्या, तर तिलक वर्मा १६ धावांवर नाबाद राहिला.