Join us

Fact Check : हार्दिकला २ सामन्यांची मुदत; रोहित Mumbai Indians ची साथ सोडण्याच्या तयारीत?

हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये  सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:08 IST

Open in App

IPL 2024 - हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये  सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली. रोहित शर्माकडून नेतृत्व हार्दिककडे दिल्याने आधीच नाराज असलेल्या चाहत्यांच्या रागात त्यामुळे भर पडली आहे. प्रेक्षक हार्दिकला स्टेडियमवर टीका करताना दिसत आहेत आणि त्यामुळे त्याचे मनोबल प्रत्यक्ष सामन्यात उतरण्यापूर्वीच खचतोय. आता एक नवी बातमी समोर येतेय, ती म्हणजे हार्दिक पांड्याला फ्रँचायझी आणखी दोन सामन्यांत संधी देणार आहेत आणि त्यात त्याने अपेक्षिक निकाल न दिल्यास पर्वाच्या मध्यंतरात MI मध्ये पुन्हा नेतृत्वबदल पाहायला मिळेल. त्यात रोहित शर्मा व हार्दिक यांच्यातील वादाच्याची चर्चा सुरू झाल्या आहेत आणि IPL 2024 नंतर रोहित MI ची साथ सोडणार असल्याचेही म्हटले जातेय...

Blog : मुंबई इंडियन्सच्या अपयशाला हार्दिक पांड्या नव्हे तर '१२वा खेळाडू' जबाबदार! पटलं तर विचार करा

मुंबईने हार्दिकला संघात पुन्हा आणल्याचा चाहत्यांना आनंद होता, परंतु फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढल्याने चाहते नाराज झाले. त्यामुळेच ते हार्दिकवर टीका करत आहेत.  सोशल मीडियावर त्याचा राग काढत आहेत. मीम्सही व्हायरल केले गेले. मीडियाने टेबल स्टोरीच्या माध्यमातून हार्दिकची कॅप्टन्सीची अट, १०० कोटींची डील अशा बातम्या पिकवल्या गेल्या आणि त्यात आणखी अशाच बातम्यांची भर पडतेय. हार्दिकला boo करणाऱ्या प्रेक्षकांना तसं करू नका अशी हात जोडून विनंती करणारा रोहित नाराज कसा असू शकतो?

News 24 Sports ने रोहित हार्दिकच्या नेतृत्वावर नाखूश असल्याच्या आणि आयपीएल २०२४ नंतर तो मुंबईची साथ सोडण्याचे वृत्त दिले आहे. पण, या केवळ अफवा आहेत. रोहित व हार्दिक यांच्यात मैदानावरील काही निर्णयावरून खटके उडाल्याचेही दावे करण्यात आले आहे. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणही चांगले राहिले नसल्याचे सांगण्यात येतेय, पण तसं काहीच नाही. या अफवांना दुजोरा देणारा एकही प्रसंग किंवा अधिकृत वृत्त हाती आलेले नाही.

सूर्यकुमार यादवची वापसी...दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मधील पहिल्या ३ सामन्यांना मुकणारा सूर्यकुमार यादव रविवारी MI च्या ताफ्यात दाखल होणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्तीचं सर्टीफिकेट दिलं आहे आणि तो आता आयपीएलमध्ये फटकेबाजीसाठी सज्ज झाला आहे.  

 

टॅग्स :आयपीएल २०२४रोहित शर्माहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्स