India Asia Cup 2025 Jay Shah Shahid Afridi Video : 14 सप्टेंबर 2025 रोजी आशिया चषकात झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातोय. या व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपूत्र आणि ICC चे अध्यक्ष जय शाह, भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी एकत्र बसून गप्पा मारताना दिसत आहेत. अनेक युजर्सनी दावा केला की, हा व्हिडीओ आशिया कप 2025 मधील आहे.
नेटकऱ्यांचा दावा...
‘मिस्टर कूल’ नावाच्या एक्स युजरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, हा आशिया कप 2025 मधील व्हिडिओ आहे. त्यानंतर इतर अनेक युजर्सनीही तसाच दावा करत ही क्लिप रि-पोस्ट केली.
नेटकऱ्यांनी शेअर केला हाच व्हिडिओ
काय आहे सत्य?
आमच्या तपासात असे आढळले की, 11 मार्च रोजी Pinkvilla ने आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. तर, त्यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी GMT News 2 च्या फेसबुक पेजवर आणि 25 फेब्रुवारी रोजी Cricket Lovers पेजवरदेखील हाच व्हिडीओ पोस्ट केलेला सापडला. या सर्व पोस्ट्स मार्च 2025 पूर्वीच्या असल्याने स्पष्ट झाले की, हा व्हिडीओ आशिया कप 2025 चा नसून जुना आहे.
हा व्हिडिओ ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील आहे. शिवाय, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी हा व्हिडीओ शूट झाल्याचेही निश्चित झाले. म्हणजेच काय, तर जय शाह, खासदार अनुराग ठाकूर आणि शाहिद आफ्रिदी यांचा व्हिडीओ जुना आहे. मात्र, आता तो आशिया कप 2025 चा असल्याचे सांगत शेअर केला जातोय.