The path to Cricket World Cup 2023 : यंदाच्या वर्षात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. यजमान भारतासह सात संघ वर्ल्ड कप २०२३ साठी पात्र ठरले आहेत आणि आता उर्वरित ३ जागांसाठी १५ संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. नेपाळने नुकत्याच झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर DLS नुसार विजय मिळवताना वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत जागा पक्की केली. नेपाळ क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला आणि आता त्यांच्यासमोर माजी विजेत्यांसह तगड्या संघाचे आव्हान आहे. नेपाळला १४ प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊन मुख्य फेरीचा मार्ग गाठायचा आहे.
क्रिकेट मॅच पाहण्यासाठी तुडूंब गर्दी; नेपाळने UAE ला नमवून घडविला इतिहास
३२ संघांपैकी १० संघांनी २०१९मध्येच मुख्य स्पर्धेचे दार ठोठावले होते आणि त्यापैकी ७ संघ २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. क्वालिफायर आणि क्लालिफायर प्ले ऑफ यांच्यातून आता उर्वरित संघ ठरणार आहेत. भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांनी २०२३ वर्ल्ड कप स्पर्धेमधील स्थान पक्के केले आहे.वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेतील आठ संघ थेट पात्र ठरणार आहेत. जागतिक क्रिकेटमधील अव्वल १३ संघांमध्ये मागील तीन वर्षांपासून ही स्पर्धा सुरू होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"