What's the '30:30 rule' in cricket for lightning and thunder stopping play IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाच्या धावफलकावर बिन बाद ५२ धावा असताना पाचव्या षटकात मैदानातील पंचांनी खेळ थांबवला. मैदानातील स्कीनवर वीज चमकल्यामुळे (Play Has Been Suspended Due To Lightning) खेळ थांबवण्यात आल्याची माहितीही झळकली. त्यानंतर पाऊस सुरु झाला. पावसामुळे खेळ थांबवण्यात येतो ही गोष्ट बऱ्याचदा पाहायला मिळते. पण तुम्हाला माहितीये का? वीज जरी चमकली तरी सामना थाबंवण्याचा नियम आहे. इथं आपण क्रिकेटच्या सामन्यात विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटानंतर अंमलात येणाऱ्या ICC च्या '30:30 नियम' म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
याआधी भारत-ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटी सामन्यात या नियमानुसार थांबवण्यात आला होता खेळ
क्रिकेटच्या मैदानात विज आणि गडगडाटामुळे सामने थांबणे हे क्वचितच घडते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात हा नियम लागू केल्याचे पाहायला मिळाले. याआधी २०२४ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटी सामन्यातही 30:30 नियमानुसार प्रोटोकॉल पाळत खेळ थांबवण्यात आला होता. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने हा विशेष नियम केला आहे. माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टॉफेल यांनी एका खास शोमध्ये या नियमासंदर्भातील सविस्तर माहिती सांगितली होती.
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
खेळाडूंसह प्रेक्षक आणि मैदानातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या खबरदारीसाठी फॉलो केला जातो हा प्रोटोकॉल
टॉफेल म्हणाले होते की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं गेल्या पाच-सहा वर्षांपासून विजेसंदर्भातील प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल 30:30 नियम म्हणून ओळखला जातो. सामना चालू असताना पंचांना वीज चमकल्याचे दिसताच, टायमर काढतात. 30 सेकंदांच्या आत गडगडाट ऐकू आला तर खेळ तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. हे खेळाडूंसह प्रेक्षक आणि मैदानातील कर्मचाऱ्यांसह सुरक्षिततेसाठी आवश्यक असते.
क्रिकेटच्या मैदानातील 30:30 नियम म्हणजे काय? पंच सामना थांबवण्याचा निर्णय कधी घेतात?
वीज चमकताच मैदानातील पंच आणि सामनाधिकारी टाइमर सुरु करतात. जर ३० सेकंदात गडगडाट ऐकू आला तर वादळाची शक्यता लक्षात घेऊन खेळ तात्काळ थांबवण्यात येतो. एवढेच नाही तर खेळाडूंसह प्रेक्षकांनाही सुरक्षित ठिकाणी थांबवण्याची खबरदारी घेतली जाते. वीज चमकल्यावर ३० सेकंदाच्या नंतर गडगडाटाचा आवाज आला तर परिस्थितीवर लक्ष ठेवून सामना सुरु ठेवला जाऊ शकतो.
Web Summary : The 30:30 rule in cricket halts play when lightning is spotted. If thunder follows within 30 seconds, play stops to ensure the safety of players, spectators, and staff. This protocol was recently observed during a match between India and Australia.
Web Summary : क्रिकेट में 30:30 नियम के अनुसार, बिजली दिखने पर खेल रोक दिया जाता है। यदि 30 सेकंड के भीतर गरज सुनाई देती है, तो खिलाड़ियों, दर्शकों और कर्मचारियों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए खेल रोक दिया जाता है। हाल ही में भारत और ऑस्ट्रेलिया के बीच एक मैच में यह प्रोटोकॉल देखा गया।