भारतीय संघाला प्रवासबंदीतून सवलत

आॅस्ट्रेलिया सरकारने या वर्षाअखेर होणाऱ्या दौ-यासाठी भारतीय संघाला प्रवास बंदीतून सूट देण्याचा विचार पुढे केल्याचे वृत्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 02:16 AM2020-04-26T02:16:51+5:302020-04-26T02:17:13+5:30

whatsapp join usJoin us
Exemption from travel ban for Indian team | भारतीय संघाला प्रवासबंदीतून सवलत

भारतीय संघाला प्रवासबंदीतून सवलत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : कोरोना व्हायरसमुळे ३० कोटी डॉलरचे नुकसान सोसावे लागल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर (सीए)फार मोठे आर्थिक संकट ओढवले. यातून बाहेर काढण्यासाठी आॅस्ट्रेलिया सरकारने या वर्षाअखेर होणाऱ्या दौ-यासाठी भारतीय संघाला प्रवास बंदीतून सूट देण्याचा विचार पुढे केल्याचे वृत्त आहे.
जगभरातील लॉकडाऊनमुळे सीएला प्रचंड आर्थिक फटका बसला. याच कारणास्तव सीएने स्टाफमधील ८० टक्के कर्मचाऱ्यांना घरी बसवले. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मॉल आणि सुपर मार्टमध्ये जूनअखेरपर्यंत तात्पुरत्या नोकºया शोधणे सुरू आहे. यासंदर्भात सीएने वॉलमार्टलादेखील विनंती केली. क्रिकेटपटूंची वेतन कपातही सुरू केली आहे. भारतीय संघाने डिसेंबर- जानेवारीत आॅस्ट्रेलिया दौरा केल्यास यजमान बोर्डाला मोठा दिलासा मिळणार आहे.
संपूर्ण जगासाठी आॅस्ट्रेलियाच्या सीमा ३० सप्टेंबरपर्यंत बंद आहेत. पुढील सहा महिने कुणीही विदेशी व्यक्ती आॅस्ट्रेलियात पाय ठेवू शकत नाही. प्रवासासंबंधीचे हे निर्बंध पुढेही सुरूच राहू शकतात. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार भारतीय संघाला पुढील मोसमासाठी आॅस्ट्रेलिया दौरा करण्यास प्रवासात सूट देरण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास क्रिकेट आॅस्ट्रेलियाला आर्थिक संकटावर मात करणे सोयीचे होणार आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाला यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाला आर्थिक वर्षात ५० कोटी डॉलरचे उत्पन्न होण्याची अपेक्षा होती. यातील मोठी रक्कम प्रसारण अधिकारातून प्राप्त होते. क्रिकेट केवळ टीव्हीपर्यंत मर्यादित राहिले तरीही सीएला पाच कोटी डॉलरचे नुकसान होईल. दुसरीकडे भारतीय संघाचा दौरा रद्द झाला तर मात्र अतोनात नुकसान होणार आहे.
आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आमचे सरकार खेळ पुन्हा सुरू करण्यास विचार करीत असल्याचे शुक्रवारी सांगितले होते. कोरोनामुळे आयपीएलदेखील अनिश्चित कालावधीसाठी स्थगित झाले आहे. यंदा टी-२० विश्वचषकाचे आयोजन आॅस्ट्रेलियातच आॅक्टोबर-नोव्ेंहबरमध्ये होणार आहे. सद्यस्थिती पाहता टी-२० विश्वचषकाचे आयोजनदेखील होऊ शकेल का, याविषयी शंका उपस्थित होत आहे. (वृत्तसंस्था)
>चारऐवजी पाच कसोटी सामन्यांचा प्रस्ताव
नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात भारताविरुद्ध होणाºया द्विपक्षीय कसोटी मालिकेची आॅस्ट्रेलियाला उत्सुकता आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे प्रमुख केविन रॉबर्ट्स यांनी भारताने आमच्या देशात चार नव्हे तर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळावी, अशी इच्छा व्यक्त केली. बीसीसीआयने मात्र तयारी दाखविलेली नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने याचा निर्णय योग्यवेळी घेऊ, असे म्हटले आहे. ‘सद्यस्थिती कठीण आहे. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर एकावेळी एकाच चेंडूवर लक्ष द्या, अशी ही वेळ आहे. सात-महिन्यानंतरच्या परिणामांचा विचार करणे योग्य नाही. आॅक्टोबरनंतर काय स्थिती असेल, हे कुणाला माहीत नाही. प्रवासासंबंधी नियमांची स्थिती काय असेल, हे पाहावे लागेल. भविष्याच्या गर्भात काय वाढून ठेवले आहे, हे कुणाला माहीत नसल्याने या प्रस्तावावर सध्या चर्चा न केलेली बरी. वर्षअखेर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळू, असे भाष्य करणे अतिघाईचे होईल,’असे अधिकारी म्हणाला.

Web Title: Exemption from travel ban for Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.