टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन करण्यात सिंहाचा वाटा उचलणारा संजू सॅमसन IPL २०२६ च्या हंगामातून चेन्नई सुपर किंग्स सह नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. IPL च्या मिनी लिलावाधी मेगा ट्रेड डीलच्या माध्यमातून संजू सॅमसन हा राजस्थानच्या ताफ्यातून चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेला आहे. एका बाजूला चाहते संजूला पिवळ्या जर्सीत मैदानात पाहायला उत्सुक आहेत. दुसरीकडे भारताचा दोन वेळचा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन MS धोनीसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी मिळाल्यामुळे जाम खूश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजू-MS धोनी यांच्यात खास संवाद
चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन संजू सॅमसन आणि महेंद्र सिंह धोनी यांचा मैदानातील एक खास फोटो शेअर केला आहे. यात ही जोडी एकमेकांसोबत चर्चा करताना दिसते आहे.
IPL 2026: राजस्थान रॉयल्सची मोठी डील फसली! संजूचा रिप्लेसमेंट यंदाच्या हंगामातून OUT?
आम्ही IPL दरम्यान भेटायचो, पण...
"आम्ही आयपीएलमध्ये भेटायचो, पण स्टेडियमवर प्रचंड गर्दी असल्यामुळे या भेटीपलीकडची भेट व्हावी, अशी इच्छा होती. नशिबाने मला त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी दिली. त्यांच्यासोबत बसणं, नाश्ता करणं, सराव करणं आणि सामना खेळणं… याचा विचार जरी केला तरी मला खूप आनंद होतो." अशा शब्दांत संजूनं दिग्गज MS धोनीसोबत खेळण्यासाठी आतुर असल्याची गोष्ट बोलून दाखवली आहे.
धोनीच्या संघासाठी संजू ट्रम्प कार्ड ठरणार का?
संजू सॅमसन हा एक दशकाहून अधिक काळ राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा भाग राहिला आहे. आता नव्या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. IPL च्या हंगामाआधी संजूनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा गाजवत आपल्यातील धमक दाखवून दिली होती. सुपर ८ मधील वेस्ट इंडिज विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात ९७ धावांची नाबाद खेळी करुन त्याने संघाला सेमीफायनलच तिकीट मिळवून दिलं. हा सिलसिला कायम राखत सेमी फायनल आणि फायनलमध्येही त्याच्या भात्यातून अर्धशतक आले. हेच सातत्य कायम राखत तो धोनीच्या CSK कडून हवा करण्यास सज्ज झालाय.
Web Summary : Sanju Samson joins Chennai Super Kings in IPL 2026, thrilled to share the dressing room with MS Dhoni. He looks forward to practicing and playing alongside the legend, expressing his excitement about the opportunity. Sanju aims to continue his T20 World Cup form for CSK.
Web Summary : संजू सैमसन आईपीएल 2026 में चेन्नई सुपर किंग्स में शामिल हुए, एमएस धोनी के साथ ड्रेसिंग रूम साझा करने के लिए उत्साहित हैं। वह दिग्गज के साथ अभ्यास करने और खेलने के लिए उत्सुक हैं, और इस अवसर के बारे में अपनी उत्तेजना व्यक्त करते हैं। संजू का लक्ष्य सीएसके के लिए टी20 विश्व कप के फॉर्म को जारी रखना है।