इंग्लंडच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन वर्षांच्या चिमुकलीचे निधन

matt dunn instagram: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वन डे मालिकेदरम्यान इंग्लंडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 12:17 IST2023-03-20T12:16:55+5:302023-03-20T12:17:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
England's star player Matt Dunn's 2-year-old daughter has passed away | इंग्लंडच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन वर्षांच्या चिमुकलीचे निधन

इंग्लंडच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन वर्षांच्या चिमुकलीचे निधन

matt dunn cricket । नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वन डे मालिकेदरम्यान इंग्लंडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू मॅट डनच्या 2 वर्षीय मुलीचे दुःखद निधन झाल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. आपली मुलगी फ्लॉरेन्स हिचे निधन झाल्याची माहिती मॅट डनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली.

आम्हाला तुझा नेहमीच अभिमान असेल - मॅट डन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅट डन मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. आपल्या मुलीचा मृत्यू एपिलेप्सीमुळे झाला असल्याचे त्याने आपल्या सोशल मीडियावरून सांगितले आहे. त्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फ्लॉरेन्ससाठी लिहिले, "माझ्या मुलीने सुंदर पंख मिळवले पण ती मृत्यूसमोर हरली. आताच्या घडीला शब्द शोधणे जवळजवळ अशक्य आहे. तू आमच्यावर इतके अविश्वसनीय प्रेम केले आणि तू अनेकांच्या जीवनावर केलेला प्रभाव हा पाहण्यासारखा आहे. तू प्रवेश केलेल्या प्रत्येक खोलीत प्रकाश टाकलास. आम्हाला तुझा सदैव अभिमान असेल." तर मॅट डनने त्याच्या अकाऊंटवर लिहिले, "तू नेहमी माझ्या हृदयात राहशील."  

मॅट डनची क्रिकेट कारकीर्द  
30 वर्षीय मॅट डनने अद्याप इंग्लंडसाठी पदार्पण केलेले नाही, परंतु त्याने इंग्लिश अंडर-19 आणि इंग्लंड लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. वेगवान गोलंदाज मॅट डनने 2010 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून 43 सामन्यांत 36.21 च्या सरासरीने 117 बळी घेतले आहेत. मॅटने मागील 11 वर्षांत 18 लिस्ट-ए आणि 23 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये सरेचे प्रतिनिधित्व केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 


 

Web Title: England's star player Matt Dunn's 2-year-old daughter has passed away