-ललित झांबरे
पहिल्या डावात फक्त ८५ धावात गुंडाळल्या गेल्याच्या मानहानीचे इंग्लंडने पुरेपूर उट्टे काढत शुक्रवारी आयर्लंडचा दुसऱ्या डावात अवघ्या ३८ धावांमध्ये फडशा पाडला आणि लॉर्डस् कसोटी सामना १४३ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात शंभरीच्या आत बाद झाल्यानंतरही एखाद्या संघाने पुढे जावून तो सामना जिंकल्याची ही सातवी वेळ ठरली आणि इंग्लंडचा हा विजय असा सहावा सर्वोत्तम विजय ठरला. विशेष म्हणजे या सातपैकी पाच सामने इंग्लंडने जिंकले आहेत आणि सातही सामन्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग होता. त्यापैकी दोन त्यांनी गमावले आहेत.
या सामन्यांचा तपशील असा-
विजयी (धावा) अंतर विरुद्ध (धावा) ठिकाण वर्ष
ऑस्ट्रेलिया (६३/१२२) ७ धावा इंग्लंड (१०१/७७) ओव्हल १८८२
इंलंड (४५/१८४) १३ धावा ऑस्ट्रेलिया (११९/९७) सिडनी १८८७
इंग्लंड (७५/४७५) ९४ धावा ऑस्ट्रेलिया (१२३/३३३) मेलबोर्न १८९४
इंग्लंड (९२/३३०) २१० धावा द.आफ्रिका (१७७/३५) केपटाऊन १८९९
इंग्लंड (७६/१६२) ५३ धावा द. आफ्रिका (११०/७५) लीडस १९०७
पाकिस्तान (९९/३६५) ७१ धावा इंग्लंड (१४१/२५२) दुबई २०१२
इंग्लंड (८५/३०३) १४३ धावा आयर्लंड (२०७/ ३८) लॉर्डस् २०१९