Join us  

बेन स्टोक्सची 'फनटास्टीक फोर'मध्ये एन्ट्री; जगात हा विक्रम करणारा चौथा खेळाडू!

England vs West Indies 2nd Test बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ली यांनी द्विशतकी भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 6:50 PM

Open in App

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात दमदार सुरूवात केली आहे. बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ली यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. 3 बाद 81 धावांवरून या दोघांनी कडवी टक्कर देताना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दमवलं. जो रूटच्या आगमनानं स्टोक्सकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्याचा फायदा सामन्यात झालेला दिसला. सिब्ली आणि स्टोक्स यांनी वैयक्तीक शतकी खेळी करताना इंग्लंडला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. स्टोक्सचे हे कसोटीतील 10वे शतक ठरले आणि त्यानं या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फनटास्टीक फोर खेळाडूंच्या पंक्तीत स्थान पटकावलं. (England vs West Indies 2nd Test)

भारताविरुद्ध केलेला विक्रम बेन स्टोक्सनं आज मोडला; कसोटीत नवा पराक्रम नोंदवला

वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडवर प्रचंड दडपण आहे. त्यांचे सलामीचे तीन फलंदाज 81 धावांवर माघारी पाठवून विंडीजनं सामन्यावर पकड घेतली होती, परंतु स्टोक्स अन् सिब्ली यांनी द्विशतकी भागीदारी केली आहे.  (England vs West Indies 2nd Test) सिब्ली 341 चेंडूंत 115 धावांवर,तर स्टोक्स 266 चेंडूंत 110 धावांवर खेळत आहे. स्टोक्सनं या कामगिरीसह एक वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत केवळ चार खेळाडूंना असा पराक्रम करता आला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा, 10 शतकं आणि 150 विकेट्स घेणारा तो चौथा खेळाडू बनला आहे. (England vs West Indies 2nd Test)

बेन स्टोक्सचा पराक्रमगॅरी सोबर्स - 8032 धावा, 26 शतकं, 235 विकेट्स, 93 कसोटीइयान बॉथम - 5200 धावा, 14 शतकं, 383 विकेट्स, 102 कसोटीजॅक कॅलिस -  13289 धावा, 45 शतकं, 292 विकेट्स, 166 कसोटीबेन स्टोक्स - 4248 धावा, 10 शतकं, 153 विकेट्स, 65* कसोटी

शिवाय कसोटीत 10 शतकं आणि 150 विकेट्स घेणारा तो पाचवा खेळाडू आहे. जॅक कॅलीस, गॅरी सोबर्स, इयान बॉथम, रवी शास्त्री यांनी यापूर्वी असा पराक्रम केला आहे.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही! 

इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट! 

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

हार्दिक पांड्यानं पोस्ट केला नताशासोबत रोमँटिक फोटो; नेटिझन्सनी पाडला कौतुकाचा पाऊस

लागली पैज; क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजाला अशा 'विचित्र' पद्धतीनं बाद झालेलं पाहिलं नसेल 

हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल

 

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजबेन स्टोक्स