Join us  

England vs Ireland 1st ODI: डेव्हिड विलीचा आयर्लंडला 'दे धक्का'; इंग्लंडसमोर माफक लक्ष्य!

England vs Ireland 1st ODI: तब्बल 382 दिवसांनी घरच्या मैदानावर वन डे सामन्यात उतरलेल्या इंग्लंडनं दमदार खेळाचे प्रदर्शन घडवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 9:46 PM

Open in App

England vs Ireland 1st ODI: तब्बल 382 दिवसांनी घरच्या मैदानावर वन डे सामन्यात उतरलेल्या इंग्लंडनं दमदार खेळाचे प्रदर्शन घडवलं. डेव्हिड विलीनं आयर्लंडला दे धक्का देताना पाच विकेट्स घेतल्या. आयर्लंडचा निम्मा संघ अवघ्या 10 षटकांत माघारी परतला होता, परंतु  कर्टीस कॅम्फरनं सहाव्या आणि आठव्या विकेटसाठी अनुक्रमे केव्हिन ओ'ब्रायन आणि अँडी मॅकब्रीन यांच्यासह अर्धशतकी भागीदारी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर आयर्लंडनं समाधानकारक पल्ला गाठला. 

कर्टीस कॅम्फरचा पराक्रम, आयर्लंडकडून इयॉन मॉर्गननं केलेल्या विक्रमाची पुनरावृत्ती

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 13 मार्चला अखेरचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर हा पहिलाच वन डे सामना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी वर्ल्ड सुपर लीगची (आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग) घोषणा केली. आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका वर्ल्ड सुपर लीगचा शुभारंभ आहे. विलीनं पहिल्याच षटकात आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्ट्रीलिंगला माघारी पाठवले. त्यानंतर एकामागून एक धक्के देत विलीनं आयर्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं, साकीब महमूदनं एक विकेट घेत त्याला साथ दिली. विलिनं टाकलेल्या सातव्या षटकात लागोपाठ दोन विकेट घेतल्या, परंतु त्याची हॅटट्रिक हुकली. आयर्लंडच्या 10 षटकांत 5 बाद 33 धावा झाल्या होत्या.

केव्हीन ओ'ब्रायन आणि कर्टीस यांनी सहाव्या 51 धावांची भागीदारी केली. केव्हीन 22 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेला सिमी सिंगही (0) पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. पण, कर्टीसनं आठव्या विकेटसाठी अँडी मॅकब्रीनसह अर्धशतकी भागीदारी केली. कर्टीसनं अर्धशतक पूर्ण करून एक विक्रम नावावर केला. आयर्लंडकडून वन डे पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी इयॉन मॉर्गननं 2006मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 99 धावा केल्या होत्या. त्यानंतर मॉर्गन आता इंग्लंड संघाचे नेतृत्व सांभाळत आहे. त्याचवर्षी एसी बोथानं इंग्लंडविरुद्घ 52 धावा केल्या होत्या.  मॅकब्रीनने 40 धावा केल्या. कॅम्फर 118 चेंडूंत 4 चौकारासंह 59 धावांवर नाबाद राहिला. आयर्लंडचा संपूर्ण संघ 172 धावांत तंबूत परतला. विलीनं 30 धावांत 5 विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरी नोंदवली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर 

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! 

139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक! 

IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?

तेव्हा 'दैव' टीम इंडियाच्या बाजूनं होतं; आफ्रिदीनं अपयशाचं खापर फोडलं नशिबावर

Bold & Beauty! भारताची पहिली महिला सर्फर इशितानं वेधलं क्रीडा विश्वाचं लक्ष

टॅग्स :इंग्लंडआयर्लंड