इंग्लंडच्या टी-20 संघातून बेन स्टोक्सला डच्चू

भारताविरोधात मायदेशी होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 16:22 IST2018-06-20T16:10:52+5:302018-06-20T16:22:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
England VS India : England drop Ben Stokes for India T20 Cricket | इंग्लंडच्या टी-20 संघातून बेन स्टोक्सला डच्चू

इंग्लंडच्या टी-20 संघातून बेन स्टोक्सला डच्चू

नवी दिल्ली - भारताविरोधात मायदेशी होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेलं नाही. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 चे क्रिकेट सामने रंगणार आहेत. 

पाकिस्तानविरोधात झालेल्या सामन्यात स्टोक्सच्या पायाचे स्नायू दुखावले होते. या दुखापतीतून तो अजूनही सावरला नसल्याने, त्याला विश्रांती दिल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.  भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघातून ट्वेण्टी-20 स्पेशालिस्ट सॅम बिलिंग्ज आणि लियाम डॉसन या दोघांनाही वगळण्यात आलं आहे. दुसरीकडे जो रुट, जॉनी बेयरस्टॉ आणि मोईन अलीसारख्या अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे.

इंग्लंडचा संघ - इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जेक बॉल, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम कुरेन, टॉम कुरेन, अॅलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय , डेविड विली

 

Web Title: England VS India : England drop Ben Stokes for India T20 Cricket