Join us

'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'

सराव सामन्यात 'द्विशतक', पण मुख्य 'टेस्ट'मध्ये चौथ्या प्रयत्नातही ठरला फिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:49 IST

Open in App

ENG vs IND 2nd Test Day 4, Karun Nair Flopped In The Fourth Consecutive Innings : बर्मिंगहॅमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातील चौथ्या दिवशी लोकेश राहुल २८ (३८) आणि करुण नायर ७ (१७ ) जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. केएल राहुलनं अर्धशतकी खेळीसह पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. पण दुसऱ्या बाजूला करूण नायर चौथ्या डावातही अपयशी ठरला. ब्रायडेन कार्सनं त्याच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. तो  २६ धावा करून तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. 'डियर क्रिकेट...गिव्ह मी वन मोअर चान्स..'  अशी साद  घातल्यावर ८ वर्षांनी त्याला कमबॅकची संधी मिळालीये. पण सलग चार डावात तो अर्धशतकापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरला आहे. ही कामगिरी 'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायला लावणारी अशीच आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कव्हर ड्राइव्ह मारायला गेला अन् कॅच देऊन बसला

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीच यशस्वी जैस्वालची विकेट गमावल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या करन नायरनं पहिल्या डावात ५० चेंडू खेळून ५ चौकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात तो यापेक्षा चांगली कामगिरी करून टीम इंडियाची आघाडी भक्कम करण्यासाठी मदत करेल, अशी अपेक्षा होती. दुसऱ्या डावातही त्याला चांगली सुरुवात मिळाली. पण ब्रायडन कार्सच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्ह खेळण्याचा नाद त्याच्या अंगलट आला. ४६ चेंडूत २६ धावांवर तो इंग्लंडचा विकेट किपर जेमी स्मिथच्या हाती झेल देऊन तंबूत परतला.

'मियाँ मॅजिक'! जे बुमराहलाही जमलं नाही ते सिराजनं करून दाखवलं

सराव सामन्यात 'द्विशतक', पण मुख्य 'टेस्ट'मध्ये चौथ्या प्रयत्नातही 'नापास'

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारत 'अ' संघाकडून इंग्लंड लायन्स विरुद्धच्या सामन्यात करुण नायरनं द्विशतक झळकावले होते. ८ वर्षांनी कमबॅक करताना लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात त्याच्या पदरी भोपळा पडला होता. ४ चेंडूचा सामना करूनही त्याला खाते उघडता आले नव्हते. दुसऱ्या डावात ५४ चेंडूत २० धावांची खेळी केली. बर्मिंगहॅमच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५० चेंडूत ३१ धावा केल्यावर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा चांगली सुरुवात मिळाल्यावर तो २६ धावांवर बाद झाला. २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात करुण नायर याने ३०३ धावांची खेळी केली होती. तो सेहवागनंतर त्रिशतक झळकवणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. पण इंग्लंड दौऱ्यात तो पहिल्या चार डावात स्वस्तात बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ