इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 312 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सनं दुसऱ्या डावात तुफान फटकेबाजी केली. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं विंडीजसमोर अखेरच्या दिवशी 312 धावांचे आव्हान उभे केले. इंग्लंडने दुसरा डाव 3 बाद 129 धावांवर घोषित केला. इंग्लंडने हा सामना जिंकून मालिका १-१ अशा बरोबरीत आणली. स्टोक्सने पहिल्या डावात १७६ आणि दुसऱ्या डावात नाबाद ७८ धावा करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह इंग्लंडनं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही मोठी झेप घेतली आहे. ( World Test Championship (2019-2021) Points Table)
बेन स्टोक्सचा पराक्रम; 14वर्षानंतर ICC Rankingमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं मिळवलं मानाचं स्थान
इंग्लंडनं पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केला होता, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 287 धावांवर गडगडला. विंडीजनं फॉलोऑन टाळले तरी स्टोक्सच्या फटकेबाजीनं त्यांच्यावरील पराभवाचं संकट वाढवलं आहे. विंडीजकडून क्रेग ब्रॅथवेट ( 75), शॅमार्ह ब्रुक्स ( 68) आणि रोस्टन चेस ( 51) यांनी अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडनं दुसऱ्या डावात स्टोक्सला सलामीला पाठवलं आणि त्यानं 57 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 78 धावा चोपल्या. (World Test Championship (2019-2021) Points Table)
इंग्लंडच्या ३११ धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला स्टुअर्ट ब्रॉडने सुरुवातीलाच तीन धक्के दिले. शॅमार्ह ब्रूक्स ( ६२) आणि जेर्मेन ब्लॅकवूड (५५) यांनी इंग्लंडचा विजय लांबवला. कर्णधार जेसन होल्डरनेहेव (३५) चिवट खेळी करून विंडीजचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले. पण, इंग्लंडने विंडीजचा डाव 198 धावांवर गुंडाळून दुसरी कसोटी जिंकली. (World Test Championship (2019-2021) Points Table)
वेस्ट इंडिजला नमवून इंग्लंडन World Test Championship (2019-2021) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांच्या खात्यात 186 गुण झाले असून 180 गुणांसह न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. भारत 360 गुणांसह अव्वल, तर ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजच्या खात्यात 40 गुण आहेत.
![]()
पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज
आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम!